Home ताज्या बातम्या चिंताजनक! देशभरात 24 तासांत कोरोनचे 2487 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 40000 वर...

चिंताजनक! देशभरात 24 तासांत कोरोनचे 2487 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 40000 वर | News


कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशात तब्बल तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 3 मे: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशात तब्बल तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, तरी देखील कोरोनबाधित रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेले नाही. तर कोरोनाबाधित रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही चिंताजनक बाब आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 2487 नवे रुग्ण आढळले आहे. तर, 83 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 40 हजारांवर पोहोचला आहे. तर 1306 कोरोना रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यानंतरही देशात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत.

हेही वाचा.. धारावीत कोरोनाचा कहर! मुंबईत 441 नवे रुग्ण, 21 जणांचा मृत्यू; एकूण बाधित 8613

आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती अशी की, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2487 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40,263 आहे. त्यापैकी 10,887 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील विविध रुग्णालयात 28,070 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1,306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशाची आर्थिक राजधानी संकटात…

महाराष्ट्राचा राजधानी मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. मुंबईत कोरोना विषाणूनं अक्षरश: कहर केला आहे.मुंबईत रविवारी कोरोनाचे 441 नवे पॉजिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुंबईत एकूण रुग्णसंख्या 8613 झाली आहे. तर कोरोनामुळे 21 मृत्यू झाला आहे. आतापर्यत कोरोनामुळे मृतांचा आकडा एकूण 343 झाला आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत रविवारी कोरोनाचे 94 नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. धारावीत कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत कोरोनाबाधितांची एकूण 590 वर पोहोचली असून आतापर्यंत 20 जणाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा…अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचवला उपाय

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. धारावीत कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या 600च्या जवळ पोहोचली आहे. रविवारी 94 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. धारावीत दाटीवाटीने तब्बल 8 ते 9 लाख लोक राहतात. येथील घरांचा आकार लहान असल्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अवघड जात असल्याचं तज्ज्ञांच मत आहे. सरकारकडून अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण येऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

1804 नागरिकांची कोरोनावर मात..

मुंबईत एकूण 1804 कोरोना रुग्ण पूर्ण पणे बरे झाले आहेत. त्या रविवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या 100 कोरोना रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत सेवेन हिल्स आणि कस्तूरबा गांधी रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संकलन, संपादन- संदीप पारोळेकर

Tags:

First Published: May 3, 2020 10:32 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

Recent Comments