Home शहरं पुणे चित्रवारीतून वारीचा अनुभव; चार कलांची अद्भुत सांगड!

चित्रवारीतून वारीचा अनुभव; चार कलांची अद्भुत सांगड!


पुणे:

‘शोध घेई जीव, पावलांसी ओढ |माझे अंतरंग पांडुरंग पांडुरंग ||काय वाचा मनी व्याकुळली जनी |सर्वांची माऊली, पांडुरंग पांडुरंग ||’

यंदा मुळे पायी सोहळा रद्द झाला असला, तरी महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भाविकांच्या मनात हीच भावना आहे. ही भावना चित्रांमधून आणि त्यावर आधारित गीतातून उलगडण्याचा प्रयत्न पुण्यातील काही तरुणांनी केला आहे. तेजस गोखले, आणि अजिंक्य गोखले यांच्या प्रयत्नातून चित्रवारी ही संकल्पना साकारण्यात आली असून, वारी सोहळ्यासंबंधित चित्रांवर एक गाणेही तयार करण्यात आले आहे. कलेच्या माध्यमातून आणि वारकऱ्यांना या तरुणांनी अभिवादन केले आहे.

क्रिएटिव्ह स्पॅल्श या संस्थेच्या तेजस गोखले आणि अजिंक्य गोखले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. तेजस गोखके यांनी ‘पांडुरंग’ नावाचे गाणे रचून त्याला समर्पक अशी सुमारे पंधरा चित्रे काढली आहेत. मोशन ग्राफिक्सचा वापर करून ही चित्रे काढण्यात आली आहेत. या चित्रांत वारकऱ्याच्या भावमुद्रा आणि त्यांची असीम भक्ती रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संगीतकार निनाद सोलापूरकर याने या गीताला संगीत दिले असून, अभिजित वाडेकर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. एकादशीच्या दिवशी ‘क्रिएटिव्ह स्पॅल्श’च्या यू-ट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित केले जाणार असून, ऑडिओ- व्हिज्युअल स्वरूपात ही चित्रे आणि गीत सर्वांना अनुभवता येणार आहेत.

यंदा वारी सोहळा रद्द झाल्याने अनेकांना रूखरूख लागली आहे. त्यामुळे अनेक तरुण वारी सोहळा व्हर्च्युअल स्वरूपात जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत. तेजस गोखले आणि निनाद सोलापूरकर यांनी केलेला हा उपक्रमदेखील पालखी सोहळ्याला दिलेली अनोखी मानवंदना ठरणार आहे.

करोनामुळे यंद पालखी सोहळा अनुभवायला मिळाला नाही. त्यामुळे व्हर्च्युअल जगात केलाचा आधार घेऊन पालखी सोहळ्याचे अनुभव सादर करावेत, अशी संकल्पना सुचली. त्यानुसार चित्रकला, संगीत, गायन, वादन अशा कलांची सांगड घालून हा उपक्रम साकार केला आहे. आमच्याकडून लाखो वारकऱ्यांना केलेले हे अभिवादन आहे. – निनाद सोलापूरकर, युवा संगीतकारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: काही आरोग्य कर्मचार्‍यांनी लस नकारणं चिंता वाढवणारंः सरकार – the two covid19 vaccines are safe the vaccine hesitancy should end government appeal...

नवी दिल्ली: करोना योद्धे डॉक्टर, नर्सेस आणि इतरांनी त्यावरील लस घेण्यात मागेपुढे पाहू नये, असं केंद्र सरकारनं म्हटलं. लस घेण्यास पात्र असलेल्यांनी करोना...

uddhav thackeray on mumbai beautification works: Uddhav Thackeray: मुंबईबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली महत्त्वाची बैठक; दिले ‘हे’ निर्देश – uddhav thackeray reviews beautification works...

मुंबई: मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण, शौचालयांची बांधणी, फूड हब उभारणी, बस थांब्यांचे नुतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात...

Recent Comments