समकालीन विषयांवरील अमूल गर्लचे कार्टुन नेहमीच चर्चेत असते.
नवी दिल्ली, 1 जुलै : अमूल ही भारतातील नामांकित डेअरी कंपनी विविध विषयांवर वेळोवेळी संदेश देणारं कार्टुन असते. या कार्टुनवरील मथळे किंवा त्यांच्यावरील संदेश कायम चर्चेत असतात.
सोमवारी भारत सरकारने 59 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी घातली, ज्या भारतात मोठ्या प्रमाणात वापर केल्या जाणाऱ्या टिकटॉक, शीन, वीचॅट सारख्या अॅप्सचा समावेश आहे. अमूलने या विषयावर डूडल तयार केले आहे. अत्यंत लोकप्रिय टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसह चीनशी संबंधित 59 अॅप्सवर सोमवारी भारताने बंदी घातली. सरकारने म्हटले आहे की ही अॅप्स देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेबाबत धोका निर्माण करू शकतात.
हे वाचा-कोरोनाची कोट्यवधींची चिनी औषधं कस्टम्सने अडवली; तुटवड्यामुळे किमती झाल्या दुप्पट
अमूलने आपल्या ट्विटरवर या प्रकरणासंदर्भात डूडल शेअर केले आहे. या डूडलमध्ये अमूलची मॅस्कॉट मुलगी रेफ्रिजरेटरसमोर लोणी घेऊन जाताना दिसत आहे. कॅप्शनवर लिहिले आहे – अमूल टॉपिकल नवी दिल्लीने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. डूडल्सवरील चिनी अॅप्सकडे लक्ष वेधून घेत लिहिले आहे की – स्टिक विथ दिस स्टॉक. वीचॅट ओव्हर टी.
#Amul Topical: New Delhi bans 59 Chinese apps! pic.twitter.com/f01D1gNBLt
— Amul.coop (@Amul_Coop) June 30, 2020
याचा अर्थ असा की या बटर स्टिकचा साठा राखला जावो. आम्ही चहावर बोलू.
सर्व अॅप्स स्टोअर वरून काढले
टिकटॉकवर मंगळवारी देशात बंदी आणली. देशातील गूगल प्ले स्टोअर व Apple Store स्टोअर वरूनही ती हटविण्यात आली आहे. सरकारने सोमवारी टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. टिकटॉक व्यतिरिक्त इतर बंदी घातलेल्या अॅपच्या सद्य स्थितीबद्दल कोणतीही त्वरित माहिती उपलब्ध झालेली नाही. काही वापरकर्त्यांच्या मते, त्यांना मंगळवारी काही काळ टितटॉक वापरता आला. टिकटॉकचे देशात सुमारे 200 दशलक्ष वापरकर्ते आहेत.
संपादन – मीनल गांगुर्डे
First Published: Jul 1, 2020 10:02 PM IST