Home ताज्या बातम्या चीनने भारताची जमीन बळकावली, राहुल गाधींचा पंतप्रधानांवर खोटं बोलल्याचा पुन्हा आरोप |...

चीनने भारताची जमीन बळकावली, राहुल गाधींचा पंतप्रधानांवर खोटं बोलल्याचा पुन्हा आरोप | National


‘चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगावं, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. वस्तुस्थिती समोर आली पाहिजे.’

नवी दिल्ली 24 जून: भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर (India china border dispute) आरोप  -प्रत्यारोपांच्या फैरी अजुन सुरूच आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर पुन्हा एकदा खोटेपणचा गंभीर आरोप केल आहे. चीनने भारताची एक इंचह जमीन घेतलेली नाही असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, लष्करचे माजी अधिकारी, सॅटेलाईटवरून घेतलेले फोटो, पत्रकार, असे सगळेच लोक चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जमीन घेतली असं सांगत आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगाव, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. सगळा देश सरकारसोबत आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर सीमेवर असणाऱ्या सैनिकांना शस्त्र का दिली नाहीत याचं उत्तरही सरकारने दिलं पहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, लडाखच्या सीमेवर चीन छुप्या पद्धतीनं नवीन चाल खेळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही देशांमधील वाढत जाणारा तणाव कमी कऱण्यासाठी वारंवार बैठका होत असतानाच आता चीननं मंसूबे आखण्याची तयारीत आहे.

हेे वाचा – राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, चीनसोबतच्या ‘त्या’ करारावर केला सवाल

चीननं पुन्हा एकदा लडाखच्या सीमेवर आपलं सैन्य वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लडाखच्या डेपसांग भागात चीनचे सैनिक आणि वाहानं वाढवल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोऱ्यातून सैन्य हटवण्याच्या झालेल्या निर्णयानंतर चीननं आता डेपसांगमध्ये सैन्य वाढवलं आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार 4 मे पासून चिनी सैन्य पूर्व लडाखच्या एलएसी प्रदेशात सैन्य क्षमता वाढवत होतं. तोफगोळे आणि शस्रास्त्रांसह 10 हजारहून अधिक सैनिक तैनात केले होते. पॅगोंग पासून गलवान खोऱ्यापर्यंत चीनच्या सैनिकांकडून अनेक हलचाली होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. भारत आणि चीनमधील सीमा संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या बैठकांमध्ये झालेला करार धुडकावून आपलं सैन्य वाढवत असल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन – अजय कौटिकवार

First Published: Jun 26, 2020 03:30 PM IST





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Anna Hazare: अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला – no team this time, anna hazare will alone go on fast over farmers issue

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘टीम अण्णा’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे...

Recent Comments