Home विदेश चीन, नेपाळनंतर आता भूतानने उचलले भारताविरोधी पाऊल!

चीन, नेपाळनंतर आता भूतानने उचलले भारताविरोधी पाऊल!


थिंफू: चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच नेपाळने नवीन नकाशा प्रसिद्ध करून भारताच्या महत्त्वाच्या भूभागावर दावा ठोकल्याने नेपाळनेही भारतविरोधी भूमिका घेतली असल्याचे समोर आले. आता, आणखी एका शेजारी देशाने भारताविरोधी पाऊल उचलले आहे. भूतानने भारताकडे जाणारे पाणी अडवले आहे.

भारत आणि भूतान या दोन्ही देशांचे संबंध अधिक चांगले राहिले आहेत. मात्र, भूतानने मागील काही दिवसांमध्ये आसाममधील बक्सा जिल्ह्यात येणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. बक्सा जिल्ह्यातील २६ हून अधिक गावातील जवळपास सहा हजार शेतकरी सिंचनासाठी डोंग योजनेवर अवलंबून आहेत. स्थानिक शेतकरी आपल्या शेतीसाठी १९५३ पासून भूतानमधून येणाऱ्या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भूतानने पाणी अडवल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले असून सरकारकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

वाचा:

वाचा:

भूतानने दिले ‘हे’ कारण!

दरवर्षी भारतीय शेतकरी या काळात भूतान सीमेवरील समद्रूप जोंगखार भागात जातात. या ठिकाणच्या काला नदीच पाणी आपल्या शेतीसाठी वापरतात.
करोनाच्या संसर्गामुळे भूतानने आपली आंतरराष्ट्रीय सीमा सील केली आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना प्रवेश बंदी केली असल्याचे भूतानच्या स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. अगदी परदेशातून भूतानचा नागरीक मायदेशी आला तरी त्याला २१ दिवस क्वारंटाइन केले जाते. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना मनाई करण्यात आली असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचा अवलंब केल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध करता येऊ शकते असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या मुद्यावर केंद्र सरकार, राज्य सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

वाचा:
दरम्यान, भारताविरोधी भूमिका घेणारे नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या अडचणीत वाढ होत आहेत. केपी ओली शर्मा यांना पक्षातंर्गतही मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते प्रचंड यांनीदेखील शर्मा यांच्यावर टीका केली आहे. चीनने नेपाळचा भूभाग ताब्यात घेतल्यानंतर आता विरोधकांनीदेखील त्यांच्याविरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. चीनने तिबेटमध्ये रस्ते निर्मितीच्या नावाखाली सुरू केलेल्या बांधकामा दरम्यान नेपाळच्या भूभागावर ताबा मिळवला आहे. कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण अहवालानुसार, १० जागांवर चीनने ताबा मिळवला असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, नेपाळच्या ३३ हेक्टर जमिनीवर नदीचा प्रवाह बदलून नैसर्गिक सीमा तयार करत ताबा मिळवला असल्याचे अहवालात म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Elgar Parishad: पुणे: एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी, ३० जानेवारीला होणार आयोजन – police give permission to the elgar parishad it will be held on...

पुणे: येत्या ३० जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे (Elgar Parishad)आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिलेली आहे. निवृत्त...

Recent Comments