Home शहरं पुणे छत्रपती शिवाजी महाराज: दगडी कमानींचा देखणा 'छत्रपती शिवाजी महाराज पूल' - a...

छत्रपती शिवाजी महाराज: दगडी कमानींचा देखणा ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ – a beautiful pool of stone arches


Chintmani.Patki@timesgroup.com

पुणे : महाराष्ट्रातील असे एकही शहर नसेल, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा चौक, रस्ता किंवा पुतळा नाही. पुण्यात छत्रपती शिवाजी रस्ता आणि महाराजांचा अश्वारूढ दिमाखदार पुतळा यात एक ऐतिहासिक पूल आहे. पूर्वी तो ‘नवा पूल’ म्हणून ओळखला जायचा. आता तो ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ म्हणून ओळखला जातो.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारातील महाराजांच्या पुतळ्यापासून शनिवारवाड्याकडे जायचे असेल, तर आपण छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून प्रवास करतो. या ब्रिटिशकालीन पुलाला ९० वर्षे झाली; पण या पुलाचे सौंदर्य, स्थापत्यशैली आणि वाहतुकीच्या दृष्टीने असलेला भक्कमपणा आजही कायम आहे. यावरून तेव्हाच्या लोकांच्या दूरदृष्टीचा आणि स्थापत्यातील सौंदर्यदृष्टीचा अंदाज येईल.

छत्रपती शिवाजी महाराज पुलाची खासियत म्हणजे समोर ऐतिहासिक शनिवारवाडा, बाजूला पुणे महापालिका आणि खाली पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीतील लाडकी पीएमपीएमएल! बाजूला असलेले ‘मंगला टॉकीज’ ही पुलाची आणखी एक खूण. विविध वस्तूंचा याच पुलावर भरणारा बाजार त्यावरून जाणाऱ्याला क्षणभर थबकून खरेदीसाठी पाऊल पुढे टाकायला लावतोच. पूर्वी येथे विक्रीस असणाऱ्या वॉकमन, रेडिओ संचातून विविध स्वर कानावर पडायचे. आता मोबाइलचे साहित्य, गॉगल, टी-शर्ट अशा वस्तू येथे उपलब्ध असतात. बैलगाडी, घोडागाडी, हत्तीवरून सफारी, ब्रिटिशांच्या अलिशान गाड्या ते आता आधुनिक गाड्या असा या पुलाचा प्रवास आहे.

पुलाने भांबुर्डा गाव जोडले

शिवाजीनगर रेल्वे स्थानक ते स्वारगेट या तेव्हा गावाबाहेरच्या भागाला जोडणारा पूल वास्तुरचनाकार केंजळे यांनी १९३० मध्ये बांधला. त्याआधी ‘बटाटा मारुती’ देऊळ बांधले. पुलामुळे भांबुर्डा गाव पुण्याशी जोडले गेले व पुण्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली. दगडात कमानीचा अतिशय देखणा असा हा पूल ९० वर्षांनंतरही भक्कम आहे.

या पुलाला सर जॉर्ज लॉइड यांचे नाव देण्यात आले. कुंभार आळीजवळ दगडी पूल आहे. पाणी अडवले जात असल्याने त्याला पूर्वी कुंभार आळीचे धरण म्हटले जात असे. हा जुना पूल म्हणून जॉर्ज लॉइड पुलाला ‘नवा पूल’ म्हटले जाऊ लागले. पुलाच्या बाजूला जुना तोफखाना होता. पुढे पुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ असे झाले.

– पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments