Home ताज्या बातम्या जगातली सर्वात मोठी बातमी: हुकूमशहा किम जोंग उन गेला कोमात, आंतरराष्ट्रीय माध्यमांचा...

जगातली सर्वात मोठी बातमी: हुकूमशहा किम जोंग उन गेला कोमात, आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा, kim-jong-un in  vegetative state after surgery International media clams mhak | News


चीनी डॉक्टरांचं एक पथक उत्तर कोरियात दाखल झालं असून ते किमच्या औषधोपचारासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हाँगकाँग 25 एप्रिल: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या प्रकृतीविषयी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. किम हा कोमात गेला असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymailने केला आहे. त्यासाठी त्यांनी हाँगकाँगच्या एका पत्रकाराचा हवालाही दिला आहे. महिनाभरापूर्वी त्याचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली. ती पुन्हा सुधारूच शकली नाही. उत्तर कोरियात किमच्या प्रकृतीबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. दरम्यान चीनी डॉक्टरांचं एक पथक उत्तर कोरियात दाखल झालं असून ते किमच्या औषधोपचारासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

चीन हा उत्तर कोरियाचा मित्र देश आहे. त्यामुळे चीनचं तिथल्या घडामोडींकडे लक्ष आहे. मात्र त्याबाबत कुठलीही माहिती बाहेर येऊ दिली जात नाही.

दरदिवशी किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत आहेत. किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी अमेरिकन माध्यमांनी बातमी दिल्यानंतर किम यांची प्रकृती नाजूक असल्याचे चर्चा सुरू झाल्या. मात्र दक्षिण कोरियानं या वृत्ताचे खंडन केले. दरम्यान, उत्तर कोरियाच्या सर्वात ताकदवान नेत्याची शस्त्रक्रिया त्यांच्या खासगी रुग्णालय आणि अत्यंत विशिष्ट डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आल्याची, माहिती आहे.

उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किमवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. ह्यंग सॅन येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. एनके डेली या वेबसाइटनुसार, किम यांच्यावर शस्त्रक्रिया करणार्‍या ह्यंग सॅनमधील डॉक्टरांची नेमणुक केवळ किम यांच्या कुटुंबावर उपचार करण्यासाठी करण्यात आली होती.

2014मध्ये किमची यांची प्रकृती नाजूक होती, तेव्हा सुद्धा याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले होते. 1994 मध्ये किमचे आजोबा किम इल सुंग यांच्या निधनानंतर हे रुग्णालय बांधले गेले. जगातील इतर कोणत्याही देशाचा याचा मागमूस येऊ नये म्हणून हे हॉस्पिटल हॉंग सॅनमध्ये बांधले गेले.

 

 

First Published: Apr 25, 2020 11:40 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Recent Comments