Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल जबरदस्त ऑफर्स, स्वस्तात मिळतोय सॅमसंगचा फोन

जबरदस्त ऑफर्स, स्वस्तात मिळतोय सॅमसंगचा फोन


नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या एका नवीन स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत सॅमसंगचा हा फोन स्वस्तात मिळत आहे. हा फोन म्हणजे Samsung Galaxy A31 स्मार्टफोन आहे. सॅमसंगच्या या फोनवर १ हजार रुपयांच्या तात्काळ कॅशबॅक ऑफरसह मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना या फोनसाठी २० हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. तसेच ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर सॅमसंग गॅलेक्सी ए३१ स्मार्टफोन खरेदी केल्यास १ हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.

वाचाः ओप्पोचा Reno 3 Pro दोन हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत


३ कलर ऑप्शनमध्ये येतोय फोन

Samsung Galaxy A31 स्मार्टफोन देशभरातील ऑफलाइन स्टोर्स, samsung.com आणि प्रमुख ई-कॉमर्स पोर्टल्सवर मिळत आहे. सॅमसंगचा हा फोन प्रिज्म क्रश ब्लू, प्रिज्म क्रश ब्लॅक आणि प्रिज्म क्रश व्हाईट या तीन कलरमध्ये मिळतोय. सॅमसंगच्या या फोनमध्ये One UI सोबत लेटेस्ट अँड्रॉयड 10 वर चालतो. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन 1080 x 240 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक Helio 6768 प्रोसेसर देण्यात आला आहे.

वाचाः चायनीज फोनसंबंधी आली मोठी न्यूज, जाणून घ्या डिटेल्स

स्मार्टफोनच्या बॅकला आहेत ४ कॅमेरे
सॅमसंग गॅलेक्सी ए३१ च्या रियर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. तसेच फोनच्या मागे, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. गॅलेक्सी ए३१ च्या फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सॅमसंगच्या फोनमध्ये बायोमॅट्रिक ऑथोटिंकेशन साठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः फेसबुकचा पासवर्ड तात्काळ बदला, या २५ अॅप्सपासून मोठा धोका

फोनमध्ये १२८ जीबीचे इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली आहे. तसेच फास्ट चार्जिंगसाठी १५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनच्या डिस्प्लेत वॉटरड्रॉप स्टाईल नॉच दिले आहेत.

वाचाः रेडमीच्या या फोनचा आज सेल, जबरदस्त ऑफर्स

वाचाः TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

वाचाः फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंदSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai local: मोबाइल नाही तर लोकलप्रवास नाही ? – local passengers association ask question to state government over mumbai local entry

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनापूर्व काळात भिन्न आर्थिक स्थिती असलेले ८० लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करत होते. यापैकी सगळ्यांकडेच अँड्राइड मोबाइल व इंटरनेटचे महागडे...

Recent Comments