Home ताज्या बातम्या जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराला मोठं यश, Four terrorists killed...

जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराला मोठं यश, Four terrorists killed in the encounter in Jammu  Kashmir mhak | National


श्रीनगर 26 एप्रिल: सर्व देशभर लॉकडाऊन असतानाही जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. आज रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाम जिल्ह्यातल्या गुद्देर या भागात ही चकमक झाली. रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरूच होती. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या असून त्यात दहशतवाद्यांना जबर हादरा बसला आहे.

सर्व जग सध्या कोरोनाविरुद्ध लढत आहे. मात्र आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या खोड्या काही बंद झालेल्या नाहीत. जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवरून 300 अतिरेकी भारतात पाठविण्याची पाकिस्तानची तयारी असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिलीय. त्यामुळे लष्काराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. या काळात राज्यात घातपात घडविण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याची माहितीही गुप्तचर सूत्रांनी दिली.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने अतिरेक्यांचे 16 लाँच पॅड सक्रिय केले आहेत. तिथे वेगवेगळ्या गटांमध्ये हे अतिरेकी आहेत. संधी मिळताच त्यांना भारतात पाठविण्याचा डाव पाकिस्तान आखत आहे.पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय दहशतवाद्यांना मदत करत आहे.

तो लढला आणि जिंकलाही! गोव्याला कोरोनामुक्त करणारा पडद्यामागचा हीरो

यासाठीच पाकिस्तान सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघनही करत आहे. सीमेवर गोळीबार करून अतिरेक्यांना घुसविण्याची पाकिस्तानची योजना आहे. दुसरी अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक अतिरेक्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला अत्यंत सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीनचा आणखी एक खोटारडेपणा उघड, सर्व जगाला बसला धक्का

चकमकीत अतिरेकी ठार झाल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेताना काळजी घेण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून कोरोना पसरण्याचा धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,  पाकिस्तानी लष्कराने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या घोषणेच्या विरुद्ध जात लष्कराने देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. लष्कर आक्रमक झाल्यामुळे इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली असं मतही व्यक्त केलं जात आहे.

First Published: Apr 26, 2020 10:36 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chatting on whatsapp: ऑफलाइन राहून Whatsapp वर करा चॅटिंग, कुणालाच दिसणार नाही ऑनलाइन – amazing trick of chatting on whatsapp while offline, no one...

नवी दिल्लीः Whatsapp वर खूप सारे फीचर्स मिळत आहेत. परंतु, एका फीचरची उत्सूकता संपत नाही. जर तुम्हाला उशीरा रात्री पर्यंत चॅटिंग करण्याची सवय...

chandrakant patil: Chandrakant Patil: ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी… विरोधकांना ‘हा’ डोस घ्यावाच लागतो!’ – chandrakant patil targets shiv sena and maha vikas aghadi

पंढरपूर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्ले...

Raghu: India vs Australia: भारतीय संघातील एक सदस्य झाला ‘गायब’? करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ… – team india’s throw down specialist raghu’s corona test...

सिडनी, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु झाला आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील एक सदस्य अजूनही सरावाला आलेला...

Shahrukh Khan Snapped Near Gateway Of India In Mumbai – तो बघ शाहरुख! बदललेल्या लुकमुळे किंग खान बाजूने चालत गेल्याचंं कोणाला कळलंच नाही

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे चाहते तो मोठ्या स्क्रीनवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये त्याचा नवीन लुक समोर आल्यानंतर चाहते...

Recent Comments