Home शहरं धुळे जळगावात विवाहितेची आत्महत्या

जळगावात विवाहितेची आत्महत्या


सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे २.३० वाजता जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे घडली. या प्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुनम घन:शाम सोनवणे (वय २५, रा. मोहाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पुनम हीचा विवाह डिसेंबर २०१७ मध्ये मोहाडी येथील घन:शाम राजेंद्र सोनवणे यांच्याशी झाले होते. या दाम्पत्यास आठ महिन्यांचा मुलगा (रुद्र) आहे. लग्नानंतर सोनवणे कुटुंबीयांनी पुनमला चांगली वागणूक दिली. यानंतर २०१८ मध्ये पुनम माहेरी बांभोरी येथे आल्यानंतर तीन भाऊ गणेश सोनवणे, आई यांना होणाऱ्या माहिती दिली होती. ‘लग्नात हुंडा दिला नाही, आता ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये आण’ अशी मागणी सासरचे लोक तिच्याकडे करीत होते. बहिणीचा संसार सुखात चालावा म्हणून भाऊ गणेश याने कपाशी विकून गोळा केलेले पैसे पुनमचा पती घन:शाम याला दिले होते. यानंतरही सासरचे तिचा छळ करीत होते. शुक्रवारी (दि. २२) घन:शाम सोनवणे यांनी शालक गणेश याला फोन केला. ‘तुझी बहीण माझे एकेत नाही, ती घरची पायरी ओलांडून जाते, तिला घेऊन जा’ असे त्याने सांगितले होते. गणेश याने मेहुणे घन:शाम यांची समजूत काढली होती. यानंतर पहाटे २.३० वाजता घन:शाम यांनी पुन्हा फोन करून गणेशला रुग्णालयात बोलावले. गणेश हा कुटुंबीयांसह रुग्णालयात गेला असता बहीण पुनम हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला सांगण्यात आले. पुनमच्या गळ्यावर काळे व्रण होते तर नाकातून रक्त आले होते. या प्रकरणी गणेश याने दिलेल्या फिर्यादीवरून पुनमचा पती घन:शाम राजेंद्र सोनवणे, सासरे राजेंद्र सोनवणे, सासू संगीताबाई सोनवणे व नणंद सरलाबाई सोनवणे या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात पुनमच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतातून जाण्यावरून एकावर विळाने हल्ला

जळगाव : तालुक्यातील उमाळा येथे ‘या शेतातून ये-जा करू नका’ असे सांगणाऱ्या तरुणासह त्याच्या पुतण्यावर चौघांनी विळीने प्राणघातक हल्ला केला. शनिवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी भिका खडसे (वय ४०, रा. उमाळा) यांचे उमाळा शिवारात शेत आहे. शेताच्या लागून गावातील शिवाजी रामदास मनोरे याची शेती आहे. शिवाजी खडसे यांच्या शेतातून इतर शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने रस्त्याच्या वाद न्यायप्रविष्ट आहे. असे असताना शिवाजी मनोरे यांना घरी जावून ‘शेतात ये-जा करण्यास मनाई असतांना शेतातून का जात आहे’ असा जाब विचारला. याचा शिवाजी मनोरे यांना राग आल्याने त्यांनी शिवाजी खडसे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण केल्याची माहिती शिवाजी खडसे यांनी भाऊ भागवत खडसे, पुतण्या संदीप भागवत खडसे, उमेश रामधन खडसे यांना सांगितली असता चारही जण शिवाजी मनोरे यांना समजविण्यासाठी गेले. या वेळी मनोरेंचा मुलगा योगेश शिवाजी मनोरे याने घरात जावून विळा आणून संदीप खडसे यांच्या डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. घटनास्थळी शिवाजी मनोरे यांचे नातेवाईक मुकेश देविदास मनोरे, देविदास रामदास मनोरे यांनीही मारहाण केली. तर शिवाजी खडसे यांच्या उजव्या पायावर लोखंडी आसारीने वार करून जखमी करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजी खडसे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी मनोरे, योगेश मनोरे, मुकेश मनोरे, देविदास मनोरे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nawab Malik: शिवेंद्रसिंहराजेच नाही, अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; मलिकांचा दावा – not only shivendra singh raje but many other leaders will return to the...

परभणी : केवळ शिवेंद्रसिंहराजेच (Shivendra Singh Raje) नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या नव्या लुकची आहे सर्वत्रच चर्चा, फोटो झाला व्हायरल… – ms dhoni changes his look again, surprises fans with style statement...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या नवीन लुकमुळे सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आला आहे. धोनीने आपला लुक बदलला आहे. धोनीच्या या नवीन लुकचा...

Recent Comments