Home शहरं जळगाव जळगाव जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद; आकडा २७९ वर

जळगाव जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद; आकडा २७९ वर


जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही करोनाचा प्रादूर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल रात्रीपासून तिथं १३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्याचा आकडा २७९ वर गेला आहे.

करोना Live: राज्यातील रुग्णसंख्या ३३ हजार पार

जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील ४८ करोना संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यातील ३५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १३ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भडगावचे १२ तर भुसावळ येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्यातील करोना बाधितांची संख्या ३३ हजारांच्या पुढं गेली आहे. काल एका दिवसात राज्यात २३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात इतक्या संख्येनं रुग्ण मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर, आतापर्यंत ७,६८८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. सध्या राज्यभरात एकूण २४१६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike-truck accident in nashik: साक्री-शिर्डी मार्गावर अपघातांची मालिका – two wheeler bike rider died in road accident in nashik

म. टा. वृत्तसेवा, सटाणासाक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर-दुचाकी मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होवून दुचाकी चालक समीर पप्पू...

health workers in nashik: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढणार – nashik local health system has decided to increase corona vaccination for heath workers

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण ११ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे...

Recent Comments