Home देश जागतिक आरोग्य संघटना : करोना रुग्ण दुसऱ्यांदा 'पॉझिटिव्ह'; WHO 'ते' ट्विट केलं...

जागतिक आरोग्य संघटना : करोना रुग्ण दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’; WHO ‘ते’ ट्विट केलं डिलीट – why recovered covid19 patients testing positive again doctor rebukes who


नवी दिल्ली : चीन, साऊथ कोरिया यांसहीत जगातील अनेक देशांत करोना व्हायरसशी निगडीत एक नवी समस्या समोर आलीय. कोविड १९ वर यशस्वीरित्या मात करणारे अनेक रुग्ण पुन्हा एकदा ‘करोना पॉझिटिव्ह’ आढळत आहेत. वुहानच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनेक प्रकरणांत रिकव्हरीनंतर रुग्ण करोना निगेटिव्ह आढळले होते. परंतु, ५०-७० दिवसांनंतर ते पुन्हा एकदा ‘पॉझिटिव्ह’ आढळलेत. याचसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) शनिवारी एक ट्विट केलं होतं परंतु, थोड्यावेळानं हे ट्विट डिलीट करण्यात आलं. ‘कोविड १९ मधून बरे होणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात अँन्टीबॉडीज बनतात किंवा ते दुसऱ्यांदा संक्रमित होण्यापासून सुरक्षित आहेत, याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही’ असं या ट्विटमध्ये म्हटलं गेलं होतं.

वाचा :
मोदी म्हणतात, अतिआत्मविश्वासात अडकू नका

वाचा :
करोनाविरुद्धची लढाई ‘पीपल ड्रिव्हन’: मोदी

वाचा :
Live : ‘प्लाझ्मा थेरपीचा वापर फायदेशीर’

वाचा :
अपडेट: तुमच्या राज्यात किती करोनाबाधित?

‘पुराव्यांचा अभाव, हा अभावाचा पुरावा असू शकत नाही’

WHO च्या याच ट्विटला कोट करताना, लोकांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, असं अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी आणि मेरीलँडमधील ‘इन्फेक्शिअस डिलीजेज’चे अध्यक्ष फहीम युनूस यांनी म्हटलंय. व्हायरल इन्फेक्शनवर मात करणारे रुग्ण रोगप्रतिकारक सक्षम असतात. त्यांची ही क्षमता महिन्यापासून ते काही वर्षांपर्यंत वापरली जाऊ शकते. पुराव्यांचा अभाव, हा अभावाचा पुरावा असू शकत नाही, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर काही वेळाने जागतिक आरोग्य संघटनेनं आपलं ट्विट डिलीट केलं.

कोविड १९ चे रुग्ण दुसऱ्यांदा संक्रमित आढळल्याची दोन कारणं असू शकतात, असंही डॉ. युनूस यांनी सांगितलं. पहिलं कारण म्हणजे, टेस्टमध्ये मृत व्हायरल RNA समजला नसेल म्हणजेच कोणताही ऍक्टिव्ह आजार नसू शकतो. कोविड १९ रुग्ण दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’ आढळले मात्र ते आजारी नाहीत, किंवा त्यांच्याद्वारे इतर कुणी संक्रमितही झाले नाहीत. साऊथ कोरियामध्येही असंच समोर आलं होतं. इथेल जवळपास २०० रुग्ण दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’ आढळले होतं… परंतु, त्यांच्यामुळे इतरांपर्यंत संक्रमण पोहचलं नव्हतं.

किंवा दुसरं कारण म्हणजे, आरोग्य तज्ज्ञांनुसार व्हायरसचं तीन स्ट्रेन्स सापडलेत. एखाद्या रुग्णाला दुसऱ्या कुणाच्या स्ट्रेपासून संक्रमण झालं असेल ज्यासाठी त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता नाही. तसंच व्हायरस शरीरातच राहिला आणि टेस्ट निगेटिव्ह आली. परंतु, काही दिवसांनंतर व्हायरस पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानं टेस्ट पॉझिटिव्ह आली असावी. परंतु,, याची शक्यता फारच कमी आहे असंही डॉ. युनूस यांनी म्हटलंय.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments