Home शहरं अहमदनगर जामखेडला आणखी तिघांना ‘करोना’

जामखेडला आणखी तिघांना ‘करोना’जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४३ वर

म. टा. प्रतिनिधी, नगर

जामखेड येथील ‘करोना’ रुग्णांच्या संख्येत रविवारी आणखी तीन जणांची भर पडली. रविवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे एकट्या जामखेडमधील ‘करोना’बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. तर, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४३ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शनिवारी ४१ व्यक्तींच्या घशातील स्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित तीन अहवालांची प्रतीक्षा होती. हे तीन अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले असून ते सर्व ‘करोना पॉझिटिव्ह’ आले आहेत. हे सर्व जण जामखेड येथील असून या रुग्णांमध्ये ४५ आणि ५० वर्षीय पुरुष आणि ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

रविवारी जामखेड येथे तीन ‘करोना’बाधित रुग्ण सापडल्यामुळे आता जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. त्यापैकी २४ जणांच्या चौदा दिवसांनंतर करण्यात आलेल्या दोन्ही स्राव नमुना चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एक, अशा दोन ‘करोना’बाधितांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १७ रुग्णांवर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये उपचार सुरू आहेत.

एका रुग्णामुळे दहा जणांना लागण?

काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील ‘करोना’बाधिताच्या दोन्ही मुलांनाही ‘करोना’ची लागण झाल्याचे समोर आले होते. या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. रविवारी पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे एका बाधित व्यक्तीमुळे दहा जणांना ‘करोना’ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आता जिल्हा आरोग्य विभागाने रविवारी आढळून आलेल्या तिन्ही बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांचे स्राव नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे काम सुरू केले आहे.

……….

सात दिवसांत चौदा रुग्ण

गेल्या सात दिवसांचा विचार करता २० ते २६ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात एकूण १४ ‘करोना’बाधित रुग्ण सापडले असून, त्यापैकी तब्बल १० रुग्ण हे जामखेडचे व उर्वरित ४ रुग्ण संगमनेर येथील आहेत. त्यामुळे जामखेड हे जिल्ह्याचे ‘करोना’ केंद्र ठरू लागले असून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी प्रशासन अधिक दक्ष झाले आहे.

……

कोट :

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

– राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी.

…….

तालुकानिहाय ‘करोना’बाधित :

तालुका उपचार सुरू बरे झालेले मृत्यू एकूण

नगर ० ११ ० ११

जामखेड ११ ५ १ १७

संगमनेर ४ ४ ० ८

राहाता ० १ ० १

नेवासे २ २ ० ४

कोपरगाव ० ० १ १

आष्टी (जि. बीड) ० १ ० १

एकूण १७ २४ २ ४३

……Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments