Home ताज्या बातम्या जालना हादरलं! जन्मदात्या आईचा खून करून मामाला केला फोन, दारुड्या मुलाचं कृत्य...

जालना हादरलं! जन्मदात्या आईचा खून करून मामाला केला फोन, दारुड्या मुलाचं कृत्य | Crime


वडील घरी नाही, ही संधी साधून दारुडा मुलानं धारदार शस्त्रानं आईवर केले सपासप वार…

जालना, 12 जून: दारुड्या मुलानं आपल्या जन्मदात्या आईचा खून करून स्वतः मामाला फोन करून याची माहिती दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. बदनापूर तालुक्यातील लालवाडी शिवारात ही घटना घडली आहे. आरोपी मुलगा फरार आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस दारुड्या खुनी मुलाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा..औरंगाबादमधील बहीण-भाऊ दुहेरी हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बदनापूर तालुक्यातील लालवाडी (तहत घाटी सिरसगाव) येथील भागचंद दगडू बारवाल (वय- 65) हे गुरुवारी रात्री पुतण्याची वास्तुशांती असल्याने त्यांच्या घरी उशिरापर्यंत होते. वडील घरी नाही, ही संधी साधून दारुडा मुलगा गोपीचंद बारवाल (वय 35) याने आई अन्साबाई बारवाल (वय 60) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अन्साबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर माथेफिरू मुलगा गोपीचंद बारवाल याने स्वतः मामाला फोन करून आईचा काटा काढल्याची माहिती दिली. या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, सहायक पोलीस निरीक्षक भिमाळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा.. 4 वर्षाच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून सलून व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी गोपीचंद भागचंद बारवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

First Published: Jun 12, 2020 01:59 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत – three children found nashik railway station to railway security force after inform his family

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड"वडील जेलमध्ये, धुणीभांडी करणारी आई दिवसभर कामावर.. आम्हाला पोटभर जेवायलाही मिळत नाही..!" या गरिबीला कंटाळून तीन चिमुकली मुले अखेर घरातून...

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

Recent Comments