Home मनोरंजन जावेद अख्तरांनी उडवली शाहिद आफ्रिदीची खिल्ली, अशोक पंडित म्हणाले, 'लाज बाळगा पाकिस्तान'

जावेद अख्तरांनी उडवली शाहिद आफ्रिदीची खिल्ली, अशोक पंडित म्हणाले, ‘लाज बाळगा पाकिस्तान’


मुंबई- पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केलं. त्याच्या या वक्तव्यामुळे तो पूरता अडकला आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर लोकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलंच शिवाय गौतम गंभीर, हरभजन सिंह, युवराज सिंह आणि शिखर धवन यांनीही त्याला जशच्या तसं उत्तर दिलं. याशिवाय प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही आफ्रिदीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे.

लग्झरी हॉटेलसारखं आहे निक- प्रियांकाचं घर

जावेद अख्तरांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘मी शाहिद आफ्रिदीचा उपदेश पाहिला. ते खरंच मजेशीर होतं. धर्म आणि राजकारणाला एकत्र केलं जाऊ नये यावर तो ज्ञान देतोय. एक म्हण आहे, दुसऱ्यांच्या डोळ्यात एखादी काडी खटकणाऱ्या लोकांना स्वतःच्या डोळ्यातली मोठंच्या मोठं लाकूड घुसलेलं दिसत नाही.’

यानंतर जावेद अख्तरांच्या या विधानावर एका ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की, ‘ओ काका.. बॉलिवूडमध्येही काही फरक नाहीये. बॉलिवूडच्या कलेची कोणतीही सीमा नाही. हे लोक तुम्हाला तुमची लायकी दाखवत आहेत आणि तुम्ही अजूनही तिथेच आहात.’ या ट्वीटला उत्तर देताना अख्तरांनी लिहिले की, ‘हैराण करणारी गोष्ट म्हणजे एवढं मुर्ख कोण असू शकतं जसा तू आहेस.’

बॉलिवूड स्टार्सचे फॅन मुमेन्ट पाहिले का?

जावेद अख्तरांशीविया सिनेनिर्माते अशोक पंडित यांनीही शाहिद आफ्रीदीच्या वक्तव्यावर राग व्यक्त केला. त्यांनी व्हिडिओ ट्वीट करत म्हटलं की, ‘आमची सेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोहम्मद शाहिद आफ्रिदी. हा व्हिडिओ त्या शहरी नक्षलवाद्यांसाठी आहे जे बोलतात की खेळ हा सीमांहून वेगळा आहे आणि ते तिथे इस्पितळ उभारू इच्छितात. पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र आहे आणि ते तसेच राहणार. लाज बाळगा पाक.’

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी-

या व्हिडीओमध्ये आफ्रिदी म्हणाला की, ” सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यात आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jee main feb exam: JEE Main 2021: पहिल्या टप्प्यात ९५ टक्के विद्यार्थी उपस्थिती – jee main 2021 exam february session 95 percent students attendance...

JEE Main 2021: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मुख्य २०२१(JEE Main 2021) चा पहिला टप्पा संपला आहे. ही...

हरवलेल्या मराठवाडी शब्दांचा अपूर्व शोध

औरंगाबाद : सिद्ध करणे आणि लुप्त झालेले शब्द शोधण्यासाठी स्थापन झालेल्या '' या समूहाने हजारो शब्दांचे संकलन केले आहे. हा संशोधन ग्रंथ...

Poco C3: ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी, पोकोच्या या फोनला खरेदी करा फक्त ६२९९ रुपयात – poco c3 buy just at rs 6200...

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या मोबाइल बोनांजा सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. हा सेल २८ फेब्रुवारी पर्यंत...

Recent Comments