Home मनोरंजन जितेंद्र जोशी: शाहरुख खानच्या वेबसीरिजमध्ये परतला 'सेक्रेड गेम्स'चा 'काटेकर' - betaal netflix...

जितेंद्र जोशी: शाहरुख खानच्या वेबसीरिजमध्ये परतला ‘सेक्रेड गेम्स’चा ‘काटेकर’ – betaal netflix web series jitendra joshi katekar sacred games


मुंबई- भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सची आतापर्यंत सर्वात जास्त चर्चीली गेलेली ‘सेक्रेड गेम्स’ मालिकेत कॉन्स्टेबल काटेकरची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची निर्मिती असलेल्या ‘बेताल’ या वेब सीरिजमध्ये तो नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. आता काटेकरच्या व्यक्तिरेखेनंतर जितेंद्र जोशी नवीन व्यक्तीरेखेत कशी कामगिरी करतो याकडे साऱ्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

जावेद अख्तरांनी उडवली शाहिद आफ्रिदीची खिल्ली, अशोक पंडित म्हणाले, ‘लाज बाळगा पाकिस्तान’

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये जितेंद्रने इन्स्पेक्टर सरताज सिंग अर्थात सैफ अली खानच्या विश्वासू माणसाची कॉन्स्टेबल काटेकरची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेनंतर प्रत्येकाच्या तोंडी जितेंद्र जोशी हेच नाव होतं. एका रात्रीत मराठमोळा जितेंद्र जोशी स्टार झाला. एका मुलाखतीत जितेंद्रने म्हटले की, ‘काटेकरची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर प्रेक्षकांना मला काहीतरी वेगळं द्यायचं होतं. म्हणूनच मी मुधालवन ही व्यक्तिरेखा निवडली. ही व्यक्तिरेखाही पार गुंतागुंतीची आहे आणि त्यात अनेक रहस्यही आहेत. तो खूप स्वार्थी आहे आणि लोकांना मूर्ख बनवत असतो.’

शाहरुख खानची निर्मिती असलेली ही वेबसीरिज एक झॉम्बी थ्रिलर आहे. यात विनीत कुमार आणि आहानना कुमरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसीरिजबद्दल बोलताना जितेंद्र म्हणाला की, ‘या सीरिजची कथा फार सशक्त आहे. घाबरवण्यासोबत ही सीरिज तुम्हाला गुंतवूनही ठेवेल.’ २४ मे रोजी नेटफ्लिक्सवर ‘बेताल’ सीरिजचं प्रीमिअर होणार आहे.

करोना- संजय दत्तच्या मदतीने अभिनेत्याने मिळवला आईसाठी बेड

‘बेताल’ ही एका अशा गावातली गोष्ट आहे जिथे दोन दशकांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचा कर्नल बेताल आपल्या झोम्बी फौजेला घेऊन परत येतो. कर्नलची बटालियन हळूहळू गावातील जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. पॅट्रिक ग्राहम यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं असून याआधी त्यांनी राधिका आपटेच्या ‘घुल’ वेबसीरिजचंही दिग्दर्शन केलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

Recent Comments