Home शहरं पुणे जीना इसिका नाम है: ‘ समाजाचे मनोबल उंचावण्याचे प्रयत्न गरजेचे’ - efforts...

जीना इसिका नाम है: ‘ समाजाचे मनोबल उंचावण्याचे प्रयत्न गरजेचे’ – efforts are needed to boost the morale of the society said sharad pawar


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सध्या संपूर्ण जग अनेक बाबतीत नैराश्येच्या गर्तेतून जात आहे. अशा परिस्थितीत समाजाचे मनोबल टिकविणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचे स्वागत झाले पाहिजे. समाजाचे मनोबल उंचाविण्याचे प्रयत्न सतत करणे गरजेचे आहे,’ अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्या आहेत.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा लिखित ‘जीना इसिका नाम है’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाले. त्या वेळी ते बोलत होते. शहा यांचे ‘जीना इसिका नाम है हे पुस्तक समाजाचे मनोबल उंचावण्याचे काम करेल,’ असा आशावाद पवार यांनी या वेळी व्यक्त केला.

‘पुस्तकातील हलकेफुलके विनोद आणि फिरक्या आताच्या परिस्थितीत मनावर फुंकर मारतील. आम्ही बीएमसीसीमध्ये शिकत असताना अशाच अनेक गमती जमती करत असू,’ असेही पवार म्हणाले.शहा म्हणाले, ‘केवळ मनोरंजन आणि निखळ आनंद देणे या भूमिकेतून मी या पुस्तकाचे लेखन केले आहे. विविध वृत्तपत्रांत प्रसंगानुरूप लिहिलेल्या लेखांचे आणि काही प्रत्यक्षात घडलेल्या विनोदी प्रसंगांचे, आठवणींचे शब्दांकन केले आहे.’

खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. के सैय्यद यांनी आकर्षक मुखपृष्ठ केले आहे. सौर प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पत्रकार पराग पोतदार आणि मेघा शिंपी यांनी संपादन सहाय्य केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

वाहतूक पोलिसांचा बेशिस्तांना दणका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेले अतिक्रमण, अतिपावसामुळे पडलेले खड्डे या समस्यांना सामोरे जात रोजच वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. त्यात व्यापारी संकुल,...

aurangabad: राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या – aurangabad coronavirus ncp taluka president attempted suicide in ghati hospital

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: घाटी रूग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका करोना रूग्णाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२७ सप्टेंबर) सकाळी...

Recent Comments