Home शहरं नाशिक जीवघेण्या अपघातांची मालिका पुन्हा सुरू

जीवघेण्या अपघातांची मालिका पुन्हा सुरूम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात गतवर्षाच्या तुलनेत यंदा जीवघेण्या अपघातांच्या संख्येत तब्बल २९ टक्के घट झाली. यामागे लॉकडाउन हे महत्त्वाचे कारण होते. करोना संकटातील ही एक इष्टापत्ती ठरली. मात्र, निर्बंध शिथिल होताच पुन्हा जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू झाली आहे. लॉकडाउनने कमावले ते गमाविण्याची सुरुवात झाली असून, त्यामागे फक्त भरधाव वेग व निष्काळजीपणा हेच कारण असल्याचे समोर येत आहे.

गतवर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ६३ जणांचा रस्ते अपघातांत बळी गेला होता. यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस लॉकडाउन लागू झाले. त्यात २०२० मध्ये हा आकडा २९ टक्क्यांनी घसरून ४५ इतका झाला. पोलिसांनी सांगितले की, या वर्षात १४९ अपघातांमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जणांना गंभीर दुखापतींना समोरे जावे लागले आहे. एप्रिल महिन्यात वाहनांची वर्दळ थांबली. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने ती शून्य झालेली नव्हती. या महिन्यात अवघ्या १२ अपघातांची नोंद झाली. मात्र, त्यात पाच जणांचा बळी गेला तर, सहा जणांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले. मागील काही दिवसांपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणावर बॅरीकेड्ससह पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे साहजिकच वेगावर नियंत्रण होते. शहरात सरासरी दर महिन्याला १३ ते १८ जीवघेणे अपघात होतात. त्यात भरधाव वेग कारणीभूत असतो.

चालकांचा निष्काळजीपणा

दरम्यान, लॉकडाउनचा चौथा टप्पा आजपासून सुरू झाला असून, रस्त्यावरील पोलिसांचा बंदोबस्त कमी झाला आहे. सिग्नल यंत्रणा बंद असून, नोकरी वा व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढते आहे. मोकळ्या रस्त्यांवर भरधाव व निष्काळजीपणाने वाहने हाकणारे आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. पंचवटीतच आतापर्यंत तीन बळी गेले असून, दारणा पुलावर झालेला अपघातही वेगाचीच परिणती असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

deep sidhu threatens to expose farmer leader: deep sidhu : दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना धमकी… ‘तुमची पोलखोल सुरू केली ना, तर…’ – deep sidhu...

नवी दिल्लीः लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्या प्रकरणी आणि आंदोलकांना चिथावल्याच्या आरोप होत असलेल्या पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने ( deep sidhu ) आपण...

maharashtra gram panchayat election: ‘त्या’ गावाचं बिंग अखेर फुटलं!; निवडणूक आयोगाने दिला मोठा झटका – nashik village panchayat polls cancelled over auctioning of posts

हायलाइट्स:लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द.राज्य निवडणूक आयोगाने उगारला कारवाईचा बडगा. याआधी राज्यात दोन गावांत झालीय अशी कारवाई.मुंबई:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक...

Recent Comments