Home ताज्या बातम्या जॅकलीन फर्नांडीसनं सोडलं सलमानचं फार्म हाऊस, कारण वाचून कराल कौतुक jacqueline-fernandez-leaves-salman-khan-farm-house-know-why |...

जॅकलीन फर्नांडीसनं सोडलं सलमानचं फार्म हाऊस, कारण वाचून कराल कौतुक jacqueline-fernandez-leaves-salman-khan-farm-house-know-why | News


अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खानच्या फार्म हाऊसवर राहत होती.

मुंबई, 1 जुलै : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खानच्या फार्म हाऊसवर राहत होती. दरम्यानच्या काळात तिनं सलमान सोबत एक अल्बम साँग सुद्धा शूट केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर खूप गाजलं होतं. सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीस स्टारर ‘तेरे बिना’ या गाण्याचं सर्व शूटिंग सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर शूट झालं होतं. पण तिनं आता सलमानचं फार्म हाऊस सोडल्याची माहिती मिळत आहे.

पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार जॅकलीन सध्या सलमानचं फार्म हाऊस सोडून मुंबईतील तिच्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेली आहे. तिची ही मैत्रीण लॉकडाऊनच्या काळात एकटी राहत आहे. दरम्यानच्या काळत ती काही प्रमाणात तणावग्रस्त आहे. लॉकडाऊन दरम्यान ती तिच्या या मैत्रिणीच्या संपर्कात होती. जसं जॅकलीनला समजलं की, तिची मैत्रीण तणावग्रस्त आहे. तेव्हा तिनं सलमानचं फार्म हाऊस सोडून मैत्रिणीचं घर गाठलं.

महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढवलं आहे. अशात आपल्या मैत्रिणीचं एकटेपण दूर करण्यासाठी आणि तिला मदत करण्यासाठी जॅकलीननं सलमानचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमानच्या तेरे बिना या गाण्यात दिसली होती. दरम्यान लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात जॅकलीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांना सकारात्मक मेसेज देण्याचा प्रयत्न करते.

First Published: Jul 1, 2020 03:37 PM IST





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments