Home ताज्या बातम्या जे पुरुषांना नाही जमलं ते महिला ग्रामसेविकेनं करून दाखवलं, तेही 'आर्ची स्टाईल'...

जे पुरुषांना नाही जमलं ते महिला ग्रामसेविकेनं करून दाखवलं, तेही ‘आर्ची स्टाईल’ | News


जालन्यात एक महिला ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जालना, 20 एप्रिल : ट्रॅक्टर चालवणारी मुलगी पहिली की आपल्या सर्वांना सैराट चित्रपटातील आर्ची आठवते. आर्चीने ट्रॅक्टर चालवतानाचे  दृश्य खूपच गाजले होते. यदृश्यामुळेच अनेक मुली ट्रॅक्टर चालवणं शिकल्या. जालन्यात एक महिला ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच गाजतोय कारण ती महिला हा ट्रॅक्टर  छंद म्हणून नव्हे तर स्वतःच्या जीवाची परवा न करता लोकांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी करत आहे.

व्हिडिओत ट्रॅक्टर चालवत औषधाची फवारणी करताना दिसणारी ही महिला आहे अनन्या भालके. अनन्या ह्या जालना तालुक्यातील गुंडेवाडी गावाच्या ग्रामसेविका आहेत. गुंडेवाडी हा तेच गाव आहे.याच गावात एक 30 वर्षीय महिला 2 दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये कोरोना पोझिटिव्ह आढळून आली होती.

हेही वाचा – ‘संतांची नाही, नराधमांची भूमी जास्त योग्य’, पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला

सदर कोरोना पोझिटिव्ह महिला नवऱ्यासोबत भांडण झाल्याने काही दिवसांपूर्वीच गुजरातला निघून गेली होती. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्या कोरोना पोझिटिव्ह महिलेच्या पतीसह तिच्या संपर्कात आलेल्या गावातील अनेकांची तपासणीकरून त्यांना क्वारंटाइन केली. गावात सर्व्हेक्षण आणि निर्जंतुकीकरण औषध फवारणीच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या.

कोरोनाच्या भीतीपोटी गावात औषध फवारणी करण्यास मजूर लोकं घाबरत होते. मजुरांची आणि ग्रामस्थांची भीती दूर करण्यासाठी ग्रामसेविका अनन्या भालके ह्यांनी मग थेट ट्रॅक्टरचा स्टेरिंग हातात घेतला आणि स्वतः आर्ची स्टाईल ट्रॅक्टर चालवत गावभर निर्जंतुकीकरण औषधीची फवारणी केली.

हेही वाचा – 20 मिनिटं आकाशात दिसले रहस्यमय ‘बर्निंग ट्रेल’, VIDEO पाहून शास्त्रज्ञ चक्रावले

महिला ग्रामसेविकेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच गाजतोय कारण, ती महिला अधिकारी हा ट्रॅक्टर छंद म्हणून नव्हे तर स्वतःच्या जीवाची परवा न करता लोकांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी करतेय. म्हणून त्या ट्रॅक्टर चालक महिला ग्रामसेविकेवर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.

 

संपादन – सचिन साळवे

 

First Published: Apr 20, 2020 12:46 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Recent Comments