Home संपादकीय जो जो कीजे परमार्थाला हो।

जो जो कीजे परमार्थाला हो।


डॉ. सुनीती सहस्रबुद्धे

शिष्य बोले लडिवाळपणे।
म्या संसार घेतला कोण्या गुणे।
मज हे दु:ख भोगणे।
किंनिमित्त घडे।।२ – पूर्वारंभ।।

समर्थ रामदासांचे एक अतिशय सुंदर लघुकाव्य, पूर्वारंभ या नावाचे आहे. या काव्याच्या आरंभीच प्रपंचाच्या दु:खाने होरपळलेला शिष्य सद्गुरूंना अत्यंत लडिवाळपणे विचारित आहे, मला कोणत्या कारणामुळे हा संसार/प्रपंच प्राप्त झाला आहे? कोणत्या कारणामुळे मला या प्रपंचाचे दु:ख भोगावे लागत आहे?

प्रपंच करीत असताना तो किती अशाश्वत आहे, किती दु:खमय आहे, हे या शिष्याच्या अनुभवाला आले आहे. मानवी जीवनात सुख आहे; तसेच दु:खही आहे. दु:ख कोणालाच नको असले, तरी ते अटळ असते. साहजिकच हे जे दु:ख भोगायला लागते, त्याचे कारण काय, असा प्रश्न शिष्याला पडलेला आहे. दु:खापासून मुक्ती मिळवून आनंदाकडे, आत्मानंदाकडे, सत्‌चित्‌आनंदाकडे जाण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. हा पारमार्थिक, आध्यात्मिक प्रवास असतो. ही परमार्थाची वाटचाल सुरू करताना, परमार्थाचा अर्थ नीट समजून घेणे, ही महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेणे अत्यंत आवश्यक असते. अनेकांना वाटते, की म्हणजे म्हातारपणी करण्याचा उद्योग, वेळ जाण्याचे साधन, धार्मिक ग्रंथांचे वाचन-पारायण, रोज पूजा करणे, मंदिरात जाणे, तीर्थक्षेत्रांना भेटी देणे अशा अनेक गोष्टी. या सगळ्यांपेक्षा परमार्थाची महत्त्वाची व्याख्या अशी आहे, की ‘परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे.’ तो अभ्यास कसा करायचा, हे समजण्यासाठी संतांच्या, त्यांच्या ग्रंथांच्या सहवासात जाणे अत्यंत आवश्यक असते. दु:खमय, अशाश्वत प्रपंचाकडून सुखमय, शाश्वत अशा परमार्थाकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात आपण नरदेहापासून करू या. चौऱ्यांशी लक्ष योनींतून प्रवास करून झाल्यावर मग मनुष्यजन्म प्राप्त होतो; त्यामुळे या जन्मातच आयुष्य सन्मार्गी लावले पाहिजे, नाही तर हा देह फुकटच जाणार. या देहाचे इतके महत्त्व आहे, म्हणून समर्थ रामदास म्हणतात,
धन्य धन्य हा नरदेहो। येथील अपूर्वता पाहो।

जो जो कीजे परमार्थाला हो। तो तो पावे सिद्धी ते।।१/१०/१।। दासबोध
हा नरदेह अत्यंत धन्य आहे. याची अपूर्वता अशी आहे, की परमार्थ प्राप्तीसाठी जे जे प्रयत्न करावेत, ते ते यशस्वी होतात. कसे, ते पाहू पुढच्या भेटीत.

(लेखिका समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याच्या अभ्यासक आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL 2021 Will Chennai Super Kings Retain Suresh Raina – IPL 2021: सुरेश रैनाबाबत CSK घेणार मोठा निर्णय; काय चाललय संघ व्यवस्थापनाच्या मनात… |...

नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सर्वात खराब झाली होती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. २०२०च्या आयपीएलचा...

Recent Comments