Home ताज्या बातम्या ज्या लेकराला जन्म दिला त्याचा डोळ्यांदेखत पाहिला मृत्यू, काळजाचं पाणी करणारा अपघात...

ज्या लेकराला जन्म दिला त्याचा डोळ्यांदेखत पाहिला मृत्यू, काळजाचं पाणी करणारा अपघात son death in front of mother in truck accident mhrd | News


गाडीचा समोरासमोर अपघात होऊन साखरेने भरलेल्या दहा चाकी ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये जाऊन पलटी झाला.

दौंड, 27 जून : दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील मसणेरवाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. खरंतर, ज्या लेकराला जन्म दिला त्याचा असा डोळ्यांदेखल झालेला मृत्यू पाहिल्याने आईला मोठा धक्का बसला आहे. साखर वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रक क्रमांक MH 42 B 9931 व होंडा शाइन क्र MH 42 AY 2031 या गाडीचा समोरासमोर अपघात होऊन साखरेने भरलेल्या दहा चाकी ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये जाऊन पलटी झाला.

या भीषण अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीररित्या जखमी झाली आहे. जखमी झालेल्या आईला दौंड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची देखील प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल? हा बडा नेता पुन्हा एकदा दिल्लीत

ट्रक चालक दौंड शुगर कारखान्याकडून साखरेने भरलेल्या ट्रक घेऊन दौंडच्या दिशेने निघाला होता तर दुचाकीवर असलेले आई व मुलगा दौंडकडून आपल्या गावी हिंगणी बेर्डी ता. दौंड या ठिकाणी निघाले होते. पण लिंगाळी हद्दीतील मसणेरवाडी ओढ्याजवळ वळणावर समोरच्या गाडीचा अंदाज न आल्याने समोरासमोर धडक होऊन यामध्ये नितीन गौतम माने वय वर्ष 20 मुलाचा मृत्यू झाला.

आई सुलाबाई गौतम माने वय वर्षे 45 गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. साखर वाहतूक करणारा ट्रक शेजारील ओढयातमध्ये जाऊन पडला यामध्ये अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास दौंड पोलीस करत आहे.

जड अंतकरणाने महाराष्ट्राच्या वीरपुत्रावर होणार अंत्यसंस्कार, कुटुंबावर शोककळा

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून नितीनचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आईने डोळ्यांदेखल आपला मुलगा गमावताना पाहिल्यामुळे सुलाबाई यांना मोठा धक्का बसला आहे.

BREAKING: राज ठाकरेंच्या घरी पोहोचला कोरोना, घरकाम करणारे 2 पॉझिटिव्ह

संपादन – रेणुका धायबर

First Published: Jun 27, 2020 10:25 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

coronavirus updates: Coronavirus मास्क न घातल्यास दोन वर्ष तुरुंगवास; ‘या’ देशाने लागू केला कायदा – people who refuse to wear covid masks will be...

अदीस अबाबा: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. काही देशांमध्ये नियंत्रणाची परिस्थिती निर्माण झाली असताना करोनाची दुसरी लाटदेखील आहे. करोनामुळे श्रीमंत आणि विकसित...

Eknath Khadase: आता कुठं बॉक्स उघडलाय, अनेक आमदार संपर्कात; आता ‘या’ नेत्यानं दिले संकेत – chhagan bhujbal welcomes eknath khadase decision join ncp

नाशिकः भाजपाचे अजून काही आमदार आणि नेते आमच्या संपर्कात आहेत, ते लवकरच भाजप सोडतील, आता तरी फक्त बॉक्स उघडलाय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Recent Comments