Home शहरं पुणे झोपडपट्टीतील नागरिकांची व्यवस्था निवारा केंद्रात

झोपडपट्टीतील नागरिकांची व्यवस्था निवारा केंद्रातमहापालिकेच्या ७० शाळांमध्ये सोय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भवानी पेठ, बिबवेवाडी, कसबा-विश्रामबाग, ढोले पाटील रोड, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील झोपडपट्टी; तसेच दाट लोकसंख्या असलेल्या पाटील इस्टेट, कासेवाडी, पर्वतीदर्शन, गुलटेकडी, लक्ष्मीनगर, लोहियानगर, लक्ष्मीनगर आदी ठिकाणी करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दीत, झोपडपट्टी भागांत राहणाऱ्या नागरिकांची महापालिकेच्या ७० शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दाट वस्तीतील नागरिकांच्या राहण्याची सोय महापालिकेच्या शाळांमध्ये केल्याचे आदेश काढले असून, त्यामध्ये नागरिकांना आपल्या जेवणाची व्यवस्था स्वत:च करावयाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना केवळ निवारा म्हणून शाळा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या निवारा प्रकल्पात राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे जेवण, गादी, चादर, स्वतःच्या देखभालीचे साहित्याची व्यवस्था स्वत: करावी, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

शहरातील सुमारे ८५ झोपडपट्ट्यांमध्ये करोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढतो आहे. दाट लोकसंख्येच्या वस्तीत, झोपडपट्टीत नागरिकांना सुरक्षित वावर या नियमाचे पालन करणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त गायकवाड यांनी झोपडपट्टी भागांतील नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध केला असून, त्यासाठी महापालिकेच्या ७० शाळांमध्ये नागरिकांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध करताना काही नियम घालण्यात आले आहेत.

असे आहेत नियम

– तात्पुरत्या निवाऱ्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांनी स्वतःचे जेवण, गादी, चादर, देखभालीच्या साहित्याची व्यवस्था स्वतःच करावयाची आहे.

– महापालिकेने शाळांमध्ये तात्पुरता निवारा प्रकल्प म्हणून फक्त राहण्याची, झोपण्यासाठी जागा उपलब्ध केली आहे.

नगरसेवकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये; तसेच स्थानिक मुख्याध्यापकांनी शाळांमधील शौचालय व्यवस्था, साफसफाई, निर्जंतुकीकरण करणे, विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निवारा अधीक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवस्था करताना महापालिकेच्या सहायक आयुक्‍तांनी आपल्या प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य घेण्याची सूचना करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘डेथ ऑडिट’कडे महापालिकेचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण औरंगाबाद शहरात कमी होताना दिसत नाही. तीन ते साडेतीन टक्क्यांवर कायमच आहे. त्यामुळे...

know about stock market: अर्थप्रबोधन व्याख्यानमाला ; समजून घ्या शेअर बाजाराची दिशा – understanding stock market

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कोविड-१९ संसर्गामुळे जगभरात मोठी उलथापालथ होत आहे. देशातील भांडवल बाजारही यातून सुटलेला नाही. शेअर बाजार नेमका कोणत्या...

Recent Comments