Home शहरं औरंगाबाद ट्रान्सफॉर्मरची वीज तोडली

ट्रान्सफॉर्मरची वीज तोडली


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

शहरासह तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून अवैधरित्या पाण्याचा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला वीजपुरवठा करणारे पाच ट्रान्सफॉर्मरच बंद केल्याने पाण्याचा ७० टक्के अवैध उपसा बंद झाला आहे. मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.

अवैधरित्या पाण्याचा उपसा होत असल्याने गिरिजा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत असून, संभाव्य पाणी टंचाईमुळे जनता चिंता व्यक्त करीत आहे. प्रकल्पातील पाण्याचा अवैधपणे उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने गस्ती पथक देखील तैनात केले आहे. कारवाईसाठी गेलेल्या पथकाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्याने पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. प्रकल्पाच्या परिसरात भाजीपाला, कलिंगड लागवड करणारे शेतकरी पाण्याचा भरमसाठ वापर करीत आहेत. याशिवाय शेतीसाठी पाणी उपसा करणारेही राजरोसपणे कोणतीही परवानगी न घेता पाण्याचा उपसा करीत आहेत. अवैध पाणी उपसा व पाण्याची कमी झालेली पातळी यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा धोका ओळखून नगर पालिकेने पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले होते. हा विषय गांभीर्याने हाताळण्याची विनंती केली आहे, मात्र तरीही पाण्याचा उपसा सुरूच असल्याने नगराध्यक्ष एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दिन यांनी पाठपुरावा करून पोलिस बंदोबस्तात कडक कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.

तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार नगर पालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी गिरिजा प्रकल्पात असलेले ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचा निर्णय घेतला. रविवारी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यू. बी. खान, पाणीपुरवठा अभियंता सचिन तोंडेवाड, नगर पालिका कर्मचारी सतीश देवरे, सुखदेव घुसळे, जितेंद्र बोचरे, कासिम बेग, अनिल फुलारे, कासीप शेख, बाळासाहेब सूर्यवंशी, साहेबराव निकम यांच्यासह महावितरणच्या मदतीने पाच ट्रासफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पाण्याचा ७० टक्के अवैध उपसा बंद झाला आहे. काही ट्रासफॉर्मरवरून ग्रामपंचायतींना कनेक्शन दिल्यामुळे तेथील ट्रासफॉर्मर बंद केले नाहीत. या कारवाईमुळे येसगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पाणी चोरी रोखण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. डिझेल पंपासारखे वेगळे मार्ग वापरून पाणी चोरी केली तर. डिझेल पंप. मोटरी जप्त करण्यात येणार आहेत.

– ज्योती भगत पाटील, मुख्याधिकारीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

President Ramnath Kovind: president speech on republic day : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन… – president ramnath kovind speech on republic day live...

नवी दिल्लीः देश उद्या आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. करोना संकटाच्या स्थितीत आणि चीन, पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती देशाला...

Recent Comments