Home ताज्या बातम्या ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, केंद्रीय पथकाने महापालिकांना दिल्या 'या' सूचना, save the...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, केंद्रीय पथकाने महापालिकांना दिल्या ‘या’ सूचना, save the lives of the people and reduce the overall death rate said the central team to the Thane Municipal Corporation mhas | News


जास्तीत जास्त चाचण्या वाढवा, जेणेकरून रूग्णांना वेळेत उपचार देता येणे शक्य होईल असेही या पथकाने सर्व महापालिका आयुक्तांना सूचित केले.

ठाणे, 27 जून : ‘कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, तर त्यामुळे रूग्णांवर वेळेत उपचार करता येतील. पण लोकांचा मृत्यू वाचविणे आणि एकूणच मृत्यूदर कमी करणे याला प्राधान्य द्या,’ अशा सूचना केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या. त्याचबरोबर जास्तीत जास्त चाचण्या वाढवा, जेणेकरून रूग्णांना वेळेत उपचार देता येणे शक्य होईल असेही या पथकाने सर्व महापालिका आयुक्तांना सूचित केले.

आज सकाळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या अधिपत्याखालील पथकाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते, याची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सह सचिव आणि स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, केंद्रीय संचालक(आरोग्य) डॉ. ई. रविंद्रन आदीं उपस्थित होते.

सुरूवातीस केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोवीड हॉस्पीटलला भेट देवून डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील 1000 बेडच्या ठाणे कोव्हिड हॉस्पीटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

पाहणी दौरा झाल्यानंतर केंद्रीय पथकाने महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचा आढावा घेतला. सुरूवातीस ठाणे महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने ठाणे जिल्हा, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर आदी महापालिकेचाही आढावा घेतला. यावेळी ठाणे पोलिस सह आयुक्त डॉ. मेखला, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त दयानिधी आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे घाबरून न जाता त्याचे योग्य व्यवस्थापन करून मृत्यू दर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी या आढावा बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे चाचण्यांची क्षमता वाढवावी जेणेकरून बाधित लोकांना वेळेवर उपचार देता येतील. त्याचप्रमाणे कोवीडची चाचणी करणा-या प्रयोगशाळांशी समन्वय साधून त्यांना मदत करा असेही यावेळी लव अग्रवाल यांनी सांगितले.

प्रतिबंधित क्षेत्राची कडक अंमलबजावणी करणे, रोजच्या रोज रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा रूग्णांचा आढावा घेणे आणि त्यांच्यावर उपचार करताना तज्ज्ञ डॉक्टरांकून मार्गदर्शन घेणे आदी गोष्टींनाही प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी क्वारंटाईन सुविधा वाढविणे, मोठ्या प्रमाणात काॅन्टॅक्ट ट्रेसींग करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखणे, मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविणे यावर लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखविली.

First Published: Jun 27, 2020 11:40 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gautam Pashankar: पुण्यातून बेपत्ता झालेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर अखेर ‘इथे’ सापडले – pune police crime branch successfully traced businessman gautam pashankar in jaipur...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे अखेर महिनाभरानंतर सापडले. त्यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश...

french company thales in india: राफेलचे भाग भारतातच ‘या’ राज्यात होणार तयार! – rafale parts to be built in up french company thales opens...

लखनऊ : भारतीय वायुदलात समावेश करण्यात आलेल्या राफेल या लढाऊ विमानाचे सुटे भाग उत्तर प्रदेशात तयार होणार आहेत. यासाठी राफेलचे भाग बनवणारी फ्रान्सची...

nashik corona update: करोनावाढीचा धोका २६ जानेवारीपर्यंत अधिक – nashik corona update : corona cases will increase till 26 January

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदिवाळीनंतर नाशिकमध्ये काही दिवसांपासून रुग्णवाढीचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. एक डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत अधिक रुग्णवाढ...

Recent Comments