Home शहरं ठाणे ठाणे परिसरात कहर; पुन्हा लॉकडाउनची मात्रा!

ठाणे परिसरात कहर; पुन्हा लॉकडाउनची मात्रा!


टीम मटा, ठाणे

ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात करोनाबाधेचा कहर झाला असून ठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारी आत्तापर्यंतच्या सर्वाधिक ३६५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर कल्याण-डोंबिवलीमध्येही ३५८ नवे रुग्ण आढळले. नवी मुंबईत २२४ नवे रुग्ण सापडले असून येथील ४४ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये येत्या सोमवारपासून ५ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीतही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहारांवर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. अंबरनाथ तसेच रायगड जिल्ह्यातील पेणमध्येही रुग्णसंख्या वाढत चालल्याने पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. ठाण्यात प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी करा आणि प्रवेशावर निर्बंध लागू करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २७ हजार ४७९ झाली असून, आत्तापर्यंत ९११ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी नव्या करोनाबाधितांची संख्या १४००ने वाढली, तर शुक्रवारीही १३३२ नवे करोनाबाधित आढळले. दररोज ३०० ते ६०० पर्यंत जिथे नवे करोनाबाधित आढळायचे, तिथे आता हजारांच्या घरात नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळेच लॉकडाउन कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. ठाण्यात शुक्रवारी ३६५ नवे रुग्ण आढळल्यावर एकूण करोनाबाधितांची संख्या ७,४५६ इतकी झाली. कळवा, मुंब्रा ही आधी अधिक प्रादुर्भावाची क्षेत्रे होती, त्यानंतर आता लोकमान्य नगर, सावरकर नगर, मानपाडा, माजीवडा हे ठरले आहेत. माजीवडा-मानपाडा भागात दहा दिवसांत अडीचशे नवे रुग्ण आढळले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारपासून पाच दिवसांचे लॉकडाउन करण्यात आले आहे. गेल्या दोन-चार दिवसांत कल्याण-डोंबिवलीत तीनशेच्या घरात नव्या रुग्णांची भर पडत असल्याने येथे सरसकट लॉकडाउन लागू करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

४४ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन

लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतरच्या काळात नवी मुंबईतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली असून तेथेही दररोज दोनशेच्या घरात नवे करोनाबाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलिस आयुक्त संजय कुमार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत पोलिस आयुक्तालयात बैठक घेतली. तेथे ४४ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय झाला. आता केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने काही ठराविक काळासाठी येथे सुरू राहतील. रुग्णसंख्या वाढत असल्याने यापुढे सुरक्षित वावराच्या बाबतीत हयगय केल्यास माफी नाही, असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण रुग्णसंख्या ४,८७७ झाली आहे व रुग्णालये भरल्यामुळे रुग्णांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. सध्या तेथे दोन हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनावाढ होत असलेल्या ठिकाणांची निश्चिती करून ते हॉटस्पॉट घोषित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अशा हॉटस्पॉटच्या निश्चितीच्या दृष्टीने अभ्यास सुरू करण्यात आला आहे. अद्याप या संदर्भात कोणतेही आदेश देण्यात आले नसून परिस्थितीनुसार पुढील निर्णय़ घेऊन ते जाहीर करण्यात येतील.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिकाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

श्वानसंख्येला पालिका रोखणार

म. टा. वृत्तसेवा, कल्याण करोनासंबंधी उपाययोजनांमधून थोडीफार मोकळीक मिळताच पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांकडे मोर्चा वळवला असून या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी एक कृतीयोजना...

Navi Mumbai: Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड – navi mumbai deceased patient kin create ruckus at nmmc hospital in vashi

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच...

Recent Comments