Home शहरं पुणे डिलिव्हरी बॉयची कामे शिक्षकांना

डिलिव्हरी बॉयची कामे शिक्षकांना



म. टा. प्रतिनिधी, पुणे/बीड

राज्यातील शिक्षकांना दारूच्या दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्याचे काम दिल्यानंतर, आता ५१ शिक्षकांना ‘डिलिव्हरी बॉय’ची कामे करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना किराणा माल; तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे काम दिले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात करोनाने थैमान घातले असून, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा करोनाच्या विरोधात लढण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यानुसार पाटोद्याच्या तहसीलदारांनी साधारण ५१ शिक्षकांची ड्युटी नगरपंचायत परिसरातील नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, किरणामालासोबतच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी शुक्रवारपासून लावण्यात आली आहे. या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे सत्र सुरुच असल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या या आदेशावर शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचं जावडेकरांना महत्त्वाचं पत्र; केली ‘ही’ विनंती – mangrove conservation aditya thackerays letter to prakash javadekar

मुंबई: राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास वा सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे...

तंबाखूजन्य पदार्थांचे नाशिकरोडला घबाड – police seize banned tobacco items worth rs 11 lakhs

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोडनाशिकमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा चोरटा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. नाशिकरोड येथे अन्न व औषध प्रशासनाने...

nitish kumar cabinet expansion likely soon: बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, कुणाची लागणार वर्णी? – bihar cm nitish kumar cabinet expansion likely soon

पाटणाः बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असताना नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग ( nitish kumar cabinet expansion likely soon ) आला...

Recent Comments