Home ताज्या बातम्या डिलिव्हरी बॉयच्या हातात बॉक्समध्ये झाला स्फोट, घडला विचित्र प्रकार | National

डिलिव्हरी बॉयच्या हातात बॉक्समध्ये झाला स्फोट, घडला विचित्र प्रकार | National


या मागे काही घातपाताची शक्यता आहे का याचाही पोलीस शोध घेत असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

चंदीगड 1 जुलै: पंजाबमधला मोगा (Moga district punjab)जिल्हा आज एका स्फोटानं (Blast) हादरुन गेला. या जिल्ह्यात कायम दहशतवादाच्या घटना घडतात. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र हा स्फोट डिलिव्हरी बॉयच्या हातात एका बॉक्समध्ये झाला. अचानक झालेल्या या स्फोटाच्या वेळी एक विचित्र आवाज आल्याने सगळेच हादरून गेले आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

हा डिलिव्हरी बॉय निहाल सिंह वाला या भागात आपल्या मित्रासोबत जात होता. तो काही कामानिमित्त एक चौकात थांबला होता. तर त्याचा मित्र काही कागदपत्रांची तपासण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी या बॉयच्या हातात असलेल्या बॉक्समध्ये अचानक स्फोट झाला आणि विचित्र आवाज आला. त्यामुळे सगळेच लोक घाबरून गेले.

या स्फोटानंतर एक प्रकारचा वासही आला. मॉत्र तो डिलिव्हरी बॉय थोडक्यात वाचला. पोलीस लगेच घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली. या बॉक्समध्ये नेमकं काय होतं ते आपल्यालाला माहित नाही. नेमहमीप्रमाणे आपण कुरियर देण्यासाठी जात होतो अशी माहिती त्या तरुणाने पोलिसांना दिली आहे. आता पोलीस आजुबाजुच्या दुकानांमधलं सीसीटीव्ही फुटेज शोधत असून स्फोटोचं नेमकं कारण काय आहे याचा शोध घेत आहेत.

Lockdownमुळे बंद होती सिनेमा टॉकीज, दार उघडताच दिसला धक्कादायक प्रकार

कुरियरच्या आतमध्ये काय असतं याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे पोलीस आता सर्वच माहिती तपासून पाहात आहेत. या मागे काही घातपाताची शक्यता आहे का याचाही पोलीस शोध घेत असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

संपादन – अजय कौटिकवार

 

 

First Published: Jul 1, 2020 11:29 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

blast in shimoga: कर्नाटकातील शिमोगा डायनामाईट स्फोटावर पंतप्रधानांचं ट्विट – pm narendra modi tweet on karnataka loud dynamite blast in shimoga

बंगळुरू : कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या स्फोटानं अनेकांना धडकी भरली. डायनामाईटच्या या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दगडखाणीत हा...

Renu Sharma Backtracks: Dhananjay Munde: मोठी बातमी! धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे – woman who accused maharashtra minister dhananjay munde of rape withdrawn...

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. 'टाइम्स...

Recent Comments