Home शहरं औरंगाबाद डॉक्टरांचा हलगर्जीपणा: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचे गेले प्राण - the girls life was...

डॉक्टरांचा हलगर्जीपणा: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचे गेले प्राण – the girls life was lost due to the negligence of the doctor


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका तेरा वर्षांच्या मुलीवर डॉक्टरने फक्त करोना आजार डोळ्यासमोर ठेवून उपचार करून घरी पाठवले. त्यानंतर मुलगी बेशुद्ध पडूनही उपचारासाठी प्रतिसाद दिला नाही. तिच्यावर जेव्हा दुसऱ्यांदा उपचार सुरू झाले, तेव्हा वेळ निघून गेली होती. मुलीने चुकीच्या उपचारामुळे प्राण सोडले. त्यामुळे फक्त करोनाच नव्हे, तर इतर रुग्णांनाही वाचवा, अशी आर्त विनवनी एका पित्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आरेफ कॉलनीत राहणारे अब्दुल हक अब्दुल अजीज यांनी आपल्या तेरा वर्षीय मुलीवर झालेल्या संपूर्ण उपचाराची हकीकत कागदपत्रांसह जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे तक्रार करून नमूद केली आहे. अब्दुल हक यांची मुलगी आयशा खान हिला अशक्तपणा येत असल्याने १९ जून रोजी एका खासगी डॉक्टरांना दाखवले. मुलीवर जास्त उपचाराची गरज असल्याचे सांगून अडमिट करण्याचा सल्ला दिला. अॅडमिट करून उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी काही रुग्णालयांची माहिती दिली.

मात्र, त्या रुग्णालयात आयसीयूची सुविधा नसल्याने शहरातील एका प्रसिद्ध खासगी सेवाभावी रुग्णालयात मुलीला रात्री दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांने आयशाला आधी कोविड १९च्या विभागात नेले. एक्स रे तपासले. या नंतर एक इंजेक्शन दिले. छोट्या उपचारानंतर ऑक्सिजन लेव्हल योग्य झाली. यामुळे तिला डिस्चार्ज करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. आयशाला अब्दुल हक यांनी २० जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास घरी आणले. मात्र, घरी आणल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यांनी तत्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना व्हॉटसअपवर मुलीची कागदपत्रे, व्हिडिओ पाठविले. मात्र, त्या दिवशी खासगी डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही.

दुसऱ्या दिवशीही तब्येत चांगली झाली नसल्याने शेवटी मुलीला त्या खासगी डॉक्टरांच्या घरी नेण्यात आले. आधी या डॉक्टरने चेकअप करण्यासाठी नकार दिला. अनेकदा विनवनी केल्यानंतर डॉक्टरच्या दगडाच्या ह्रदयाला पाझर फुटला. त्यांनी मुलीचे चेकअप केले. त्वरित बीडबायपास रोडवरील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तसेच मुलीबाबत हॉस्पिटललाही माहिती दिली. या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एका ज्युनिअर डॉक्टरने मुलीला पाहिले. या मुलीच्या रक्ताची तपासणी केली. तपासणीनंतर मुलीच्या शरिरात साखरेचे प्रमाण क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याचे सांगितले. तसेच करोनाच्या अंगाने मुलीची तपासणी केली. या तपासणीत करोनाची लक्षणे दिसली नाहीत. मुलीवर उपचार सुरू झाले. मात्र, तोपर्यंत वेळ हातातून निघून गेल्याने आयेशाने २१ जून रोजी रात्री १२ वाजता या जगाचा निरोप घेतला.

मुलीचे आजारपण हे ‘नाटक’

अब्दुल हक म्हणाले, ‘मुलीवर उपचार करण्यासाठी एका सेवाभावी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी कोविड १९च्या लक्षणानुसार तपासणी केली. एक्स रे पाहिल्यानंतर डॉक्टरांने ही मुलगी नाटक करित आहे. तिला मानसशास्त्रीय उपचाराची गरज असल्याचे सांगितले. मुलीला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यावेळी डॉक्टरांचे हे उत्तर ऐकून त्रास झाला. त्या डॉक्टराने योग्य उपचार केले असते, तर तर आज माझी मुलगी जिवंत राहिली असती’.

योग्य उपचार मिळाले नाहीत

सध्या मोठ्या हॉस्पीटलमधील काही तज्ज्ञ डॉक्टर हे फक्त करोना आजाराच्या नजरेतून रुग्णांकडे पाहतात. ते अन्य आजाराबाबत विचार करत नाहीत. यामुळेच शहरातील मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. माझ्या मुलीचा प्राण हा योग्य उपचार मिळाला नसल्याने गेला आहे. किमान शहरातील अन्य रुग्णांवर योग्य उपचार मिळावा. आपल्या मुलीसोबत झालेल्या प्रकार इतर रुग्णांसोबत होऊ नये, अशी मागणी अब्दुल हक यांनी जिल्हाधिकारीऱ्यांना निवेदन देत केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Union Budget 2021: ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये हलवा शिजला ; ‘बजेट’मध्ये सामान्यांचे तोंड गोड होणार का? – north block celebrate halwa ceremony as budget preparation begins

नवी दिल्ली : यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची छपाई होणार नसली तरी त्यापूर्वी होणाऱ्या हलवा बनवण्याचा (Halwa Ceremony) सोहळा शनिवारी दिल्लीतील अर्थ खात्याचे मुख्यालय असलेल्या...

Aurangabad Corona Update: नव्या ३८ बाधितांची भर; ५६ जणांनी सुट्टी – aurangabad corona update : aurangabad reported 38 new corona cases in yasterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यात शनिवारी ३८ करोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरी भागातील ३१ तर ग्रामीण भागातील सात रुग्णांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात १६७ करोनाबाधित...

Recent Comments