Home संपादकीय डोनाल्ड ट्रम्प: वर्णद्वेष, करोनामुळे ट्रम्प यांची पिछेहाट? - because of racism and...

डोनाल्ड ट्रम्प: वर्णद्वेष, करोनामुळे ट्रम्प यांची पिछेहाट? – because of racism and coronavirus will donald trump go one step down


हरीश जोशी

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारून पुन्हा व्हाइट हाउसमध्ये जाण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आतुर आहेत. मात्र, त्यांचा फेरनिवडणुकीचा मार्ग हा खडतर असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. अमेरिकेतील करोनामृत्यूंची संख्या सव्वा लाखावर गेली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी श्वेतवर्णीय पोलिसांच्या अत्याचारात जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्पविरोधी असंतोषाचा भडका उडाला आहे. करोनामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेची पडझड झाली आहे. बेरोजगारीही वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा निवडणुकीचा मार्ग काठीण बनला आहे.

श्वेतवर्णीयांचा श्रेष्ठतावाद पोसून, वंश व वर्णद्वेषाला खतपाणी घालून ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांचा मोठा गट निर्माण केला आणि २०१६मधील निवडणूक जिंकली. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हा नारा देऊन राजकीय स्वार्थासाठी संकुचित राष्ट्रवाद जागृत केला. त्यानंतर महाभियोगातूनही तांत्रिक बहुमताने निसटले. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार व माजी उपाध्यक्ष जो बायडेन यांची लोकप्रियता अलीकडच्या मतदार चाचणीत वाढल्याचे दिसून आले आहे. अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्या कामाला असलेल्या पसंतीबाबतच्या (जॉब अप्रुव्हल) सर्वेक्षणात ते बेचाळीस टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले. विद्यमान अध्यक्षांबाबतची पसंती अशा सर्वेक्षणात पन्नास टक्क्यांखाली नोंद झाली, तर त्यांच्या फेरनिवडणुकीच्या यशाची शक्यता कमी मानली जाते. एका नोंदणीकृत मतदारांच्या निवडणूकपूर्व राष्ट्रीय चाचणीतही बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर भरघोस आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.

या चाचण्या व सर्वेक्षणाची पुष्टी करणारी एक महत्त्वाची घटना गेल्या रविवारी घडली. ओक्लाहोमा येथे गाजावाजा करीत ट्रम्प यांनी आपली पहिली जाहीर निवडणूक सभा घेतली व तिचा अत्यल्प उपस्थितीमुळे फज्जा उडाला. एका स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सभेचा डांगोरा स्वतः ट्रम्प यांनीच पिटला होता. तेथे प्रचंड गर्दी होणार असल्याचे भाकीत केले होते.

करोना संसर्गाच्या काळात सभा, संमेलने आयोजित करण्यास ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सनेच विरोध केला होता. मात्र, सार्वजनिक आरोग्याचे संकेत पायदळी तुडवून ट्रम्प यांनी अशी सभा घेतल्याने त्यावर टीकाही झाली. कृष्णवर्णीयांनी फ्लॉइडच्या हत्येच्या निषेधार्थ केलेली निदर्शने, तसेच निर्माण केलेले कथित भीतीचे वातावरण या बोल लावून ट्रम्प यांनी सभेतील नगण्य उपस्थितीचे समर्थन केले. उलटपक्षी बायडेन यांनी टास्क फोर्स तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार समाजमाध्यमांचा उत्तम उपयोग करून जाहीर सभा घेण्याचे टाळले.

डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या करोना व्यवस्थापनावर ताशेरे ओढले. ट्रम्प यांनी वर्णद्वेष पोसून दक्षिण अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीच्या लाजिरवाण्या इतिहासाच्या पर्वाला उजाळा दिला, असा आरोपही डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे. बायडेन यांच्या मागे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा भक्कमपणे उभे आहेत. पोलिस अत्याचारांच्या विरोधात परत असलेली ‘ब्लॅक लाइव्ह्‌ज मॅटर’ ही देशव्यापी चळवळ, या चळवळीला मोठ्या प्रमाणात मिळत असलेला सर्वसामान्य श्वेतवर्णीय नागरिकांचा पाठिंबा यामुळे ट्रम्प व रिपब्लिकन पक्षाचे धाबे दणाणले आहे. अमेरिकेत मतदारांचा एक मोठा हिस्सा (सुमारे तेरा टक्के) कृष्णवर्णीय आहे. फ्लॉइडच्या हत्येनंतर आगडोंब उसळला असून, ट्रम्प यांचे चिथावणीखोर नेतृत्व त्यास जबाबदार मानले जात आहे.

कृष्णवर्णीयांचा संताप उफाळून आणणारी आणखी एक घटना अलीकडे घडली. अमेरिकेत अठराव्या शतकात संघराज्याला व समान नागरी हक्कांना पाठिंबा देणारी उत्तरेतील व कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीची परंपरा कायम राखण्यासाठी वेगळी झालेली दक्षिणेतील राज्ये यांच्यात १८६१ ते १८६५ या काळात नागरी युद्ध झाले. दक्षिणेत अजूनही गुलामगिरीला कायम ठेवण्यासाठी लढलेल्या गोऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची स्मारके आहेत. लष्करी तळांना त्यांची नावे आहेत.

या गुलामगिरीच्या खुणा व त्या परंपरेचा गौरव करणारी स्मारके काढून टाकावीत या मागणीस संरक्षण दलाची संमती असूनही ट्रम्प यांनी विरोध केला आहे. असे अनेक पुतळे सध्याच्या चळवळीत उखडले जात असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुलामगिरीची प्रथा व वसाहतवादाचे समर्थक महणून आंदोलकांचे लक्ष्य असलेल्या स्मारकांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन, रूझवेल्ट, अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा शोध ज्याने लावला त्या वसाहतवादी ख्रिस्तोफर कोलंबस यांच्या स्मारकांचाही समावेश आहे.

ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी लिहिलेल्या स्फोटक पुस्तकामुळे ट्रम्प यांची अडचण वाढली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन होऊ नये म्हणून ट्रम्प यांनी जीवाचे रान केले. या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यास अत्यंत संवेदनशील अशी राष्ट्रीय गुपिते उघडकीस येतील व ते अमेरिकेसाठी घातक असेल, असा युक्तिवाद व्हाइट हाउसच्या वकिलांनी कोर्टात केला. मात्र, कोर्टाने तो फेटाळला. व्हाइट हाउसमध्ये महत्त्वाच्या पदावर दीड वर्षे काम केलेल्या बोल्टन यांच्या या पुस्तकातील प्रसिद्ध झालेल्या उताऱ्यातून ट्रम्प यांच्या दुटप्पी परराष्ट्रनीतीची झलक पाहायला मिळते. यातील एक प्रमुख मुद्दा हा चीन बद्दलचा आहे.

चीनला धडे शिकविण्याची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांनी चक्क चीनचे हुकुमशहा शी जीनपिंग यांना नोव्हेंबरमध्ये फेरनिवड व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतीमा आपली उंचावण्यास मदत करून सहकार्य करावे, अशी गळ घातली होती. त्याबदल्यात अनुकूल व्यापारी करार, तसेच चीनकडून होणारे मानवाधिकारांचे उल्लंघन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची तयारीही दर्शिविली होती. याशिवाय युक्रेनवर बायडेन यांच्यावर भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ट्रम्प यांनी आणलेल्या दडपणाचाही उल्लेख यात आहे.

वर्णभेद मिटविण्याऐवजी ट्रम्प यांनी एक कृष्णवर्णीय तरुण गोऱ्या तरुणाला मारहाण करीत असल्याचे छायाचित्रदेखील व्हायरल केले. अध्यक्षांकडून बहुवांशिक एकतेचा संदेश अपेक्षित असताना वर्णद्वेषाचाच प्रसार झाला. आपण पुन्हा विजयी झालो नाही, तर गोऱ्या लोकांना या वर्णद्वेषविरोधी चळवळीपासून म्हणजेच कृष्णवर्णीयांपासून धोका निर्माण होईल, असा अप्रत्यक्ष संदेश ट्रम्प देत आहेत.

परंतु, कृष्णवर्णीयांबरोबरच अनेक गोऱ्या मतदारांचा ट्रम्प यांच्याबद्दल भ्रमनिरास होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर येत आहे. येत्या चार महिन्यांत काही नाट्यपूर्ण घडामोडी होऊन ट्रम्प यांना अनुकूल अशा घटना घडल्या तरच त्यांच्या बाजूने पुन्हा वारे वाहू शकेल. परंतु, सध्या तरी डेमोक्रॅटिक उमेदवार बायडेन यांच्या नेमस्त, समतोल व मानवाधिकाराविषयी जागरूक भूमिकेची स्वीकार्हता व लोकप्रियता मतदारांमध्ये अधिक असल्याचे चित्र आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

diego maradona death: स्टार फुटबॉलपटू मॅरेडोना यांच्या निधनानं बॉलिवूड हळहळलं – srk, priyanka chopra, kareena kapoor khan and other celebrities mourn the loss of...

मुंबई : महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं काल म्हणजेच बुधवारी निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं वृत्त...

Pune crime news: २० वर्षांपासून मूल होत नसल्याने केले बाळाचे अपहरण; सख्ख्या बहिणींना अटक – Pune Hadapsar Police Arrested Two Womens For Kidnapping A...

म. टा. प्रतिनिधी, हडपसर: हडपसर येथील गाडीतळ परिसरातून अपहरण झालेले बाळ गुरुवारी सापडले. वीस वर्षांपासून मूल होत नसल्याने एक वर्षाच्या या बाळाला पळवून...

gold price today: सोने-चांदीमध्ये तेजी ; जाणून घ्या आजचा सराफाचा दर – Gold Silver Price Rise Today

मुंबई : मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८७१० रुपये आहे. त्यात १९७ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव एक...

Recent Comments