Home ताज्या बातम्या ...तर राज्यात सुरु होऊ शकतात वाईन शॉप, आरोग्यमंत्र्यांची मद्यपींसाठी खूशखबर! | Crime

…तर राज्यात सुरु होऊ शकतात वाईन शॉप, आरोग्यमंत्र्यांची मद्यपींसाठी खूशखबर! | Crime


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यपींसाठी एक खूशखबर दिली आहे.

मुंबई, 20 एप्रिल: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यपींसाठी एक खूशखबर दिली आहे. ती, म्हणजे राज्यात वाईन शॉप लवकरच सुरु होऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केल्यास वाईन शॉपवर कोणतीही बंदी असणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह आणि झूम अॅपच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे यांनी राज्यात वाईन शॉप सुरु करण्याबाबत संकेत दिले.

हेही  वाचा..राज्यात 75 हजार रॅपिड टेस्ट करण्यास अखेर केंद्र सरकारची मान्यता

दरम्यान, देशासह राज्यात 3 मेपर्यत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जीवनाश्यक वस्तू वगळता राज्यात सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात आली आहे. त्यात हॉटेल, बियर बार आणि वाईनशॉपचा समावेश आहे. मात्र, 20 एप्रिलनंतर संचारबंदी शिथिल करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. याकाळात अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र बंदी असलेल्या यादीत दारुच्या दुकानांचा उल्लेख नाही. तसंच ते कधी सुरु होणार याबाबतही खुलासा करण्यात आलेला नाही. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रश्न करण्यात आला होता.

दरम्यान, कोरोनाची लक्षणं लपवून ठेऊ नका. कारण लक्षणं न दिसताही कोरोना रुग्ण सापडत आहे. थोडीशी जरी लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जा, स्वत:साठी इतरांना धोक्यात टाकू नका, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मीच माझा रक्षक… मी कोरोनाला हरवणारच, असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी  जनतेचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा…कोरोनाची लक्षणं लपवून इतरांना धोक्यात टाकू नका, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

संपादन- संदीप पारोळेकर

First Published: Apr 21, 2020 01:11 AM IST



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health workers in nashik: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा टक्का वाढणार – nashik local health system has decided to increase corona vaccination for heath workers

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण ११ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करवून घेण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे...

raksha khadse vs eknath khadse in raver: Raksha Khadse: एकनाथ खडसेंना आता सूनेचेच आव्हान; रक्षा खडसेंनी केला ‘हा’ निर्धार – raksha khadse challenges eknath...

जळगाव: माझ्या भूमिकेबाबत अनेकांच्या मनात शंका असली तरी कुठल्याही परिस्थितीत मी पक्ष सोडणार नाही व भाजपातच राहणार असल्याचे सांगत भाजप खासदार रक्षा खडसे...

Kaushal Inamdar: गाण्याचे लयतत्व हेच त्याचे प्राणतत्व – संगीतकार कौशल इनामदार – indian musical composer kaushal inamdar present various poems at marathi language conservation...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकवितेत म्हणण्यासारखे काही असावे. कधी कधी मुक्तछंदालाही आपली लय असते. ती लय संगीतकाराला सापडली तर गाणे होते. कुठल्याही गाण्याचे लयतत्व...

Recent Comments