Home ताज्या बातम्या तळातून दिसणाऱ्या गुरू ग्रहाचा PHOTO व्हायरल, भारतीय म्हणाले 'हा तर साऊथ इंडियन...

तळातून दिसणाऱ्या गुरू ग्रहाचा PHOTO व्हायरल, भारतीय म्हणाले ‘हा तर साऊथ इंडियन डोसा’ Jupiter photo shared on social media indians says its a indian cuisine dosa mhjb | Viral


सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. एखादा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर येणाऱ्या कमेंट्स देखील भन्नाट असतात.

मुंबई, 01 जुलै : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. एखादा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर येणाऱ्या कमेंट्स देखील भन्नाट असतात. सोशल मीडियावर अशा लक्षवेधी कमेंट्स करण्यामध्ये भारतीयांचा हात कुणी धरू शकणार आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर पेजने एक फोटो शेअर केला आहे आणि असा दावा केला आहे की ‘गुरू (Jupiter) ग्रह तळातून असा दिसतो’. @Learnsomething या पेजने या फोटो शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. हा फोटो जितका भन्नाट आहे, तेवढ्याच त्यावर आलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत.

भारतीयांनी या फोटोमध्ये दिसणारी वस्तू गुरू ग्रह नसून ‘डोसा’ आहे असेच थेट म्हटले आहे. काहींनी यावर कमेंट करताना तर चक्क डोसा बनवण्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

काही सोशल मीडिया युजरनी हा फोटो खोटा असल्याचा देखील दावा केला आहे. फोटो शेअर करणाऱ्या पेजने ‘Jupiter looks like from the bottom’ असा दावा केल्यामुळे काहींनी त्यावर शंका उपस्थित केली आहे.

मात्र अनेकांनी या फोटोवर कमेंट करताना डोशाचे फोटो पोस्ट केले आहेत. 27 जून रोजी शेअर करण्यात आलेल्या या फोटोवर 34 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत तर 6 हजारांहून अधिक वेळा हा फोटो रिट्वीट करण्यात आला आहे.

(या फोटोची सत्यता ‘News18 लोकमत’ने अद्याप पडताळलेली नाही. ही बातमी अपडेट करण्यात येईल. )

संकलन, संपादन – जान्हवी भाटकर

Tags:

First Published: Jul 1, 2020 11:18 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक ३१ ऑक्टोबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० Source link

Mumbai local: मोबाइल नाही तर लोकलप्रवास नाही ? – local passengers association ask question to state government over mumbai local entry

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनापूर्व काळात भिन्न आर्थिक स्थिती असलेले ८० लाख प्रवासी लोकलमधून प्रवास करत होते. यापैकी सगळ्यांकडेच अँड्राइड मोबाइल व इंटरनेटचे महागडे...

Recent Comments