Home शहरं नागपूर ताडोबा अभयारण्य: पहिल्याच दिवशी ५२ पर्यटकांनी लावली ताडोबाला हजेरी - 52 tourists...

ताडोबा अभयारण्य: पहिल्याच दिवशी ५२ पर्यटकांनी लावली ताडोबाला हजेरी – 52 tourists attended on the first day itself at tadoba


म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

मागील साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये बुधवारपासून मान्सून पर्यटन सुरू झाले. पहिल्याच दिवशी ५२ पर्यटकांनी हजेरी लावली.

ताडोब्यात सकाळ व दुपारच्या सत्रात मिळून १२ वाहनांतून ५२ पर्यटकांनी पर्यटनाचा लाभ घेतला. सकाळच्या सत्रात पाच वाहनांमधून २२ पर्यटकांनी सफारी केली. त्यात आगरझरी गेटमधून तीन तर कोलारा गेटवरील दोन वाहनांचा समावेश आहे. दुपारच्या सत्रात सात वाहनांतून ३० पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. यात आगरझरी येथून चार तर देवाडा, मदनापूर व अलिझंझा या गेटमधून प्रत्येकी एक वाहन गेले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सफारी सुरू होण्याआधी सर्व खबरदारी घेतली जात घेतली जात आहे. सकाळी गेटवर पर्यटकांचे थर्मल टेस्टिंग करून जिप्सी सॅनिटाइज करण्यात आल्या. पर्यटनासाठी आरक्षण हे ऑफलाइन असून सबंधित प्रवेशद्वारावर प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाते.

पर्यटकांसाठी नियमावली

– पर्यटकांना मास्क, सॅनिटायजर वापरावे लागेल

– या दोन वस्तू नसल्यास भ्रमंतीला नकार

कुठून मिळणार प्रवेश?

– देवाडा

– अडेगाव

– आगरझरी

– जुनोना

– नवेगाव

– रामदेगी

– अलिझंझा

– कोलारा

– मदनापूर

– खिरकाळा

– पांगडी

– झरीपेठ

कोअर झोनचे दरवाजे

१ ऑक्टोबरला उघडणार

पावसाळी सुट्टीमुळे व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनचे दरवाजे बंदच आहेत. परिणामी आता कोअर झोनमधील व्याघ्रपर्यटन हे १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis writes to CM Thackeray: Metro Carshed: मेट्रो कारशेड प्रश्नी फडणवीसांनी केले उद्धव ठाकरेंना सावध – opposition leader devendra fadnavis has written letter...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमेट्रो-३च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी अहवाल तयार करून नवीन समितीचा निव्वळ फार्स करण्यात येत...

Recent Comments