Home मनोरंजन तारक मेहता का उल्टा चष्मा: २५ दिवसांच्या शुटिंगचे 'जेठालाल' घेतो ३६ लाख,...

तारक मेहता का उल्टा चष्मा: २५ दिवसांच्या शुटिंगचे ‘जेठालाल’ घेतो ३६ लाख, रॉयल आहे खासगी आयुष्य – taarak mehta ka ooltah chashmah jethalal aka dilip joshi unknown facts about his personal life


मुंबई- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला लोकांनी भरभरून प्रेमदिलं. एवढ्या वर्षांनंतरही लोकांची या मालिकेसाठीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. या मालिकेतील जेठालालची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिलीप जोशीचंही जबरदस्त फॅनफॉलोविंग आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांना महागड्या गाड्या विकत घेण्याची क्रेझ आहे. याशिवाय २५ दिवसांच्या चित्रीकरणासाठी दिलीप जोशी जवळपास ३६ लाख रुपयांचं मानधन घेतात. याशिवाय त्यांच्या खासगी आयुष्यातील फारशा माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊ..

आता प्रत्येकाला वेळेवर मिळणार विमा संरक्षण

दिलीप जोशी यांची आवडती गाडी-

रिपोर्टनुसार, दिलीप यांना गाड्यांची फार आवडत आहे. त्यांच्याकडे अनेक गाड्यांचं कलेक्शनही आहे. त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत त्यापैकी ऑडी- क्यू ७ ही आहे. या गाडीची किंमत जवळपास ८० लाख रुपये आहे. याशिवाय इनोवाही आहे. या गाडीची किंमतही १४ लाखांच्या घरात आहे.


२५ दिवस करतात मालिकेचं चित्रीकरण-

दिलीप जोशी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ३० पैकी २५ दिवस काम करतात. या २५ दिवसांसाठी ते जवळपास ३६ लाख रुपयांचं मानधन घेतात.

एक वेळी अशी होती की दिलीप यांच्याकडे काम नव्हतं-

मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांनी मालिकांशिवाय अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. असं असूनही एक वेळ असी होती की, त्यांना कोणी काम देत नव्हतं. तारक मेहता मालिका साइन करण्याच्या १ वर्ष आधी त्यांच्याकडे काम नव्हतं. मात्र या मालिकेने त्यांचं नशिब बदललं आणि यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

आधी मुंबईत क्वारंटाइन होणार, मगच बाहेर जाणार

दिलीप जोशीच्या पत्नीचं नाव-

दिलीप जोशी यांच्या अभिनयाचं तर सारेच कौतुक करतात. त्यांच्या संवाद फेकीमुळे प्रेक्षकांच्या आवडत्या व्यक्तीरेखांमध्ये जेठालाल ही व्यक्तीरेखा अग्रणी आहे. दिलीप जोशी यांच्या पत्नीचं नाव जयमाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

दरम्यान, पुढच्या महिन्यात तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेला १२ वर्ष पूर्ण होणार आहेत. आतापर्यंत या मालिकेचे २ हजार ९५० भाग पूर्ण झाले आहेत. या १२ वर्षांमध्ये मालिकेत अनेक कलाकार तेच राहिले तर काही कलाकार हे बदलत राहिले. २८ जुलै २००८ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका टीआपीच्या शर्यतीत असून टॉप १० मधील आपली जागा कधीही सोडली नाही.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Made in India Metro: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first india made metro will be in mumbai on 27 january

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

LIVE : गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील 150 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments