Home शहरं नागपूर तुकाराम मुंढे: तुकाराम मुंढेंनी बळकावले सीईओपद, गडकरींचा आरोप - tukaram mundhe grabbed...

तुकाराम मुंढे: तुकाराम मुंढेंनी बळकावले सीईओपद, गडकरींचा आरोप – tukaram mundhe grabbed the ceo post says nitin gadkari


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

केंद्राचे अर्थसहाय्य लाभलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध, बेकायदेशीर, भ्रष्ट आणि घटनाबाह्य कृती करुन सीईओपद बळकावल्याचा गंभीर आरोप नागपूरचे खासदार व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. या कृतीबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्याकडे केली आहे.

स्मार्ट सिटीचे सीईओपद व महापालिकेतील कारभारावरून महापौर संदीप जोशी यांनी आरोप केल्यानंतर ‘मी ना लबाड, ना खोटारडा’ अशी भूमिका मुंढे यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. यानंतर भाजप नेत्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली. शनिवारी झालेल्या एका संवादात गडकरी यांनी मुंढे यांच्या कारभारावर बारकाईने लक्ष असल्याचे सांगून योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचा इशारा दिला आणि लगेच अडीच पानाच्या निवेदनासह तब्बल १७ पानांच्या तक्रारीची प्रत जितेंद्रसिंह व पूरी यांच्याकडे पाठविल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने मुंढे यांच्यावर मंगळवारी ‘डबल अटॅक’ केला अशी चर्चा होती.

महापालिका आणि राज्य सरकारने एकत्र येऊन १ जुलै २०१६ रोजी ‘नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ ही संयुक्त कंपनी स्थापन केली. १८ जुलै रोजी जारी केलेल्या जीआरनुसार संचालक मंडळात महापालिकेद्वारे सहा, राज्य सरकार चार आणि केंद्राच्यावतीने एक संचालकांची नियुक्ती करण्याचे नमूद करण्यात आले. दोन स्वतंत्र संचालक म्हणजे महापालिका आयुक्त नामनिर्देशित संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्याचे स्पष्ट केले.

संचालक मंडळाची अखेरची म्हणजे १४ वी बैठक ३१ डिसेंबर रोजी झाली. रामनाथ सोनवणे यांनी ११ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर घटनेचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे सीईओचे पद बळकावल्याचा गंभीर आरोप गडकरी यांनी केला आहे. कंपनीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी नियुक्ती केल्याचे त्यांनी वारंवार जाहीर केले. प्रत्यक्षात अध्यक्षांनी ही नियुक्ती केलेली नाही. सीईओ नियुक्तीचे पूर्ण अधिकार संचालक मंडळाला असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. याबाबत संपूर्ण कृतीची तत्काळ दखल घेऊन स्मार्ट सिटीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा धोका टाळण्यासाठी मुंढे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नितीन गडकरी यांनी केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments