फक्त 1600 रुपये महिना या सेविकांना मिळत आहे. त्यांचं मानधन जुलैपासून वाढणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून शासनाच्या नव्या अध्यादेशाची माहिती टोपे यांनी दिली.
मुंबई, 25 जून :अत्यंत तुटपुंज्या मासिक पगारावर जिवाची बाजी लावून Coroanavirus च्या साथीत काम करणाऱ्या आशा सेविकांना दिलासा देणारी बातमी आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशा सेविकांचं मानधन वाढवण्याची घोषणा केली आहे.
फक्त 1600 रुपये महिना या सेविकांना मिळत आहे. त्यांचं मानधन जुलैपासून वाढणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून शासनाच्या नव्या अध्यादेशाची माहिती टोपे यांनी दिली. राज्यातील सर्व आशा भगिनीच्या मानधनात 2 हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात 3 हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, असं आरोग्यमंत्री म्हणाले.
येत्या जुलै महिन्यापासूनच त्यांना वाढीव मानधन मिळणार आहे.
आशा सेविकांचे मानधन वाढवून द्यावेत अशा मागणीचं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलं होतं. यासंदर्भात पाठपुरावाही केला होता.
संकलन – अरुंधती
First Published: Jun 25, 2020 06:01 PM IST