Home शहरं औरंगाबाद 'ते' ९ तास... करोनाचं क्रौर्य पाहून औरंगाबादकर हादरले!

'ते' ९ तास… करोनाचं क्रौर्य पाहून औरंगाबादकर हादरले!


औरंगाबाद: औरंगाबादमध्ये अवघ्या नऊ तासांमध्ये सात बाधितांनी उपचारादरम्यान प्राण गमावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या १२८ झाली असून जिल्ह्यात सारेच हादरले आहेत. दुसरीकडे गुरुवारी दिवसभरात करोनाचे सर्वाधिक १५५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या २४३० झाली आहे. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १३६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व सध्या ९३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

बाधास्वामी कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला ५ जून रोजी येथे दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी हा रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. गंभीर , , मधुमेह आदींमुळे उपचारादरम्यान या रुग्णाचा १० जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. कटकटगेट परिसरातील ५७ वर्षीय महिला रुग्णास ९ जून रोजी दाखल केले होते व १० जून रोजी ही महिला करोना बाधित असल्याचे निदान झाले होते. न्युमोनिया, श्वसनविकार, उच्चरक्तदाब, मधुमेहामुळे या महिलेचा १० जून रोजी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. नूतन कॉलनीतील ४० वर्षीय पुरुष रुग्णाला ८ जून रोजी दाखल केले होते व ९ जून रोजी रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. गंभीर श्वसविकार व न्युमोनियाने रुग्णाचा १० जून रोजी रात्री साडेअकराला मृत्यू झाला. त्रिमूर्ती नगर येथील ६७ वर्षीय पुरुष रुग्णास ९ जून रोजी दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी रुग्ण बाधित असल्याचे चाचणीवरुन निदान झाले असतानाच, श्वसनविकार, न्युमोनियाने रुग्णाचा १० जून रोजी रात्री साडेअकराला मृत्यू झाला. नागसेन नगर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णास ७ जून रोजी दाखल केले होते व रुग्ण हा बाधित असल्याचे ९ जून रोजी स्पष्ट झाले होते. श्वसनविकार, न्युमोनिया, मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या गुंतागुंतीमुळे रुग्णाचा १० जून रोजी मध्यरात्रीनंतर पावणेतीन वाजता मृत्यू झाला. तर, रोशनगेट परिसरातील ६० वर्षीय महिला रुग्णाला ४ जून रोजी दाखल केले होते व ५ जून रोजी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. न्युमोनिया, उच्चरक्तदाब, श्वसनविकार, स्थुलत्वाच्या गुंतागुंतीतून रुग्णाचा गुरुवारी (११ जून) पहाटे साडेचारला मृत्यू झाला. त्याचवेळी आतापर्यंत घाटीमध्ये ९८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे घाटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच रोशन गेट परिसरातील एकूण ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवारी मध्यरात्री दोन वाजता उपचारादरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांच्या मृत्युची संख्या १२८ झाली आहे.

९० पुरुष, ६५ महिलांचा बाधितांमध्ये समावेश

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १५५ बाधितांमध्ये जयसिंगपुरा, बेगमपुरा येथील १, मिसारवाडी १, सुभेदारी विश्रामगृहाजवळ १, उस्मानपुरा २, एन-आठ १, जुना बाजार १, आकाशवाणी परिसर १, उल्कानगरी १, संजय नगर २, एन-दोन सिडको १, गणेश कॉलनी १, बुढीलेन २, बायजीपुरा १, बंजारा कॉलनी ४, हेडगेवार रुग्णालय परिसर १, एमजीएम रुग्णालय परिसर १, शिवाजी नगर ५, उत्तम नगर ४, कैलास नगर ७, गादिया विहार १, सहकार नगर १, नक्षत्रवाडी १, चेलीपुरा १, टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी १, संजय नगर, बायजीपुरा ३, एन-सात सिडको १, न्यायनगर २, हुसेन कॉलनी १, संजय नगर, मुकुंदवाडी १, सातारा परिसर १, साईनगर, एन सहा २, एन-आठ सिडको, गजराज नगर १, पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा २, हरिप्रसाद अपार्टमेंट १, दशमेश नगर १, पद्मपुरा २, गांधी नगर ३, सिल्कमिल कॉलनी १, विशाल नगर ३, बेगमपुरा २, गोविंद नगर १, समता नगर २, फाजीलपुरा ४, न्यू हनुमान नगर ५, सिडको एन-आठ १२, गौतम नगर, घाटी परिसर २, रशीदपुरा १, मयूर पार्क म्हसोबा नगर १, भवानी नगर २, भारतमाता नगर ३, विजय नगर १, गारखेडा, गजानन नगर १, कोहिनूर कॉलनी १, जिल्हा परिषद परिसर २, हर्सुल सावंगी १, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर ३, टीव्ही सेंटर १, बिस्मिला कॉलनी ३, सिडको वाळूज महानगर-एक २, एकता नगर, हर्सूल परिसर १, बजाज नगर ८, साई नगर, पंढरपूर ३, जुनी मुकुंदवाडी ७, नारेगाव १, गंगापूर १, नायगाव १, सिल्लोड १, उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर १, वेदांत नगर १, एसआरपीएफ परिसर २, इटखेडा १, साईनगर, पंढरपूर १, शहागंज १, जटवाडा रोड १, शरीफ कॉलनी, रोशन गेट १, फतेह मैदान परिसर, फुलंब्री १, एसटी कॉलनी १, पैठण गेट १ व इतर ठिकाणचे २, अशा ९० पुरूष आणि ६५ महिलांचा समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse Blames Devendra Fadnavis For Quit Party – फडणवीसांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय; खडसेंचा थेट आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: 'माझा आजही भाजपवर रोष नाही. पण, मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. पण मी फक्त फडणवीसांवर खूप नाराज आहे. माझ्यावर...

salman khan: सलमान खानच्या कुटुंबाची ट्वेन्टी-२० लीगमध्ये एंट्री, संघात ख्रिस गेल खेळणार… – bollywood star salman khan’s brother sohail own team in sri lanka...

नवी दिल्ली : बॉलीवूड आणि क्रिकेटचे जुने नाते आहे. आयपीएलमधील संघही काही बॉलीवूड स्टार्सने खरेदी केलेले आहेत. आता यामध्ये बॉलीवूडचा भाईजान असलेला सलमान...

Sushant Singh Rajput Case Dipesh Sawant Demands Ncb For 10 Lakh Compensation – सुशांत केसः दिपेश सावंतची मागणी; NCB वर गंभीर आरोप करत मागितले...

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक...

nokia 2 v tella: दोन दिवस बॅटरी लाईफचा नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत – nokia 2 v tella with mediatek helio a22 soc,...

नवी दिल्लीः HMD ग्लोबल ने नवीन नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच केला आहे. हा कंपनीचा नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे....

Recent Comments