Home देश दहशतवाद्यांना कंठस्नान: पुलवामा : २४ तासांची चकमक आणि तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान -...

दहशतवाद्यांना कंठस्नान: पुलवामा : २४ तासांची चकमक आणि तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान – encounter ends in jammu kashmirs tral after 24 hours three terrorists neutralized, pulwama


पुलवामा, जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्रास भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये २४ तास सुरू असलेली चकमक अखेर संपुष्टात आली. तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ही चकमक थांबलीय.

त्रालच्या चेवा उलार भागात ही चकमक गुरुवारी सायंकाळपासून सुरू झाली होती. सुरक्षा दलाला एका घरात १ – ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती.

राष्ट्रीय रायफल्सचे ब्रिगेडीयर विजय महादेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालच्या चेवा उलार भागात लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या एका संयुक्त टीमनं सर्च ऑपरेशन हाती घेतलं होतं. याच दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलाकडून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं. परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. शुक्रवारी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. या घटनेत कोणत्याही नागरिकाला हानी पोहचलेली नाही.

वाचा :india-china clash: चीनची कुरघोडी सुरूच; ‘वाय’ नाल्याचा मार्ग केला ब्लॉक
वाचा :सीमेवरील तणाव आणि गलवान हिंसेला चीन जबाबदार, भारताने सुनावले
वाचा :…तेव्हाच LAC वर तणाव संपुष्टात येईल, भारताची चीनला समज!
या वर्षात खोऱ्यात सुरक्षा दलाला दहशतवाद्यांविरोधात मोठं यश हाती लागलंय. काश्मीर रेंजचे आयजी विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार महिन्यात चार टॉप दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अन्सार गजवात उल हिंद यांचे कमांडर वेगवेगळ्या एन्काऊन्टरमध्ये ठार करण्यात आलेत.

या वर्षीच्या पहिल्या १५० दिवसांत जवळपास १०२ दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालंय. केवळ याच महिन्यात सेनेनं २० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.

वाचा :भारत-चीन वाद: चीनने आपले काही सैनिक मागे हटवले, वाहनेही घेतली मागे
वाचा :काश्मीर: सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona free gram panchayat in thane: करोना वेशीबाहेर – 45 gram panchayat of thane district not found single corona positive patient

म. टा. वृत्तसेवा, ठाणेदेशभरात सर्वत्र करोनाच्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण असताना ठाण्यातील ४५ ग्रामपंचायमतींमध्ये आत्तापर्यंत एकही करोनारुग्ण आढळलेला नाही. नियमांचे काटेकोर पालन करत वेगवेगळ्या...

gold price today: Gold Rate Today सोने तेजीत ; सलग दुसऱ्या सत्रात सोने दरात वाढ – gold price surge second consecutive day

मुंबई : कमॉडिटी बाजारात बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली. बाजार बंद होताना सोने ३१० रुपयांनी महागले. सोन्याचा...

Recent Comments