Home शहरं पुणे दारुगोळा कारखानेआजपासून सुरू

दारुगोळा कारखानेआजपासून सुरूम . टा. प्रतिनिधी, पुणे

खडकी येथील अॅम्युनिशन फॅक्टरी व हाय एक्स्प्लोझिव्हस फॅक्टरी या दोन्ही दारूगोळा निर्मिती कारखान्यांचे कामकाज आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. सध्या ३३ टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील. त्या संदर्भातील सूचना दोन्ही कारखान्यांनी जाहीर केल्या आहेत.

खडकीतील दोन्ही कारखाने व कामगारांच्या क्वार्टर्स असलेला रेंज हिल परिसराचा कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश नाही. त्यामुळे ३३ टक्के कर्मचाऱ्यांसह येथील कामकाज सुरू होऊ शकते, असे खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे सीईओ प्रमोद कुमार सिंह यांनी सांगितले.

सध्याच्या आदेशानुसार ३३ टक्के कर्मचाऱ्यांसह सोमवारपासून कामकाज सुरू होईल. उर्वरित कर्मचारी घरीच थांबतील. मात्र, कामकाजाच्या वेळेत ते फोन अथवा इंटरनेटच्या माध्यमातून कामासाठी उपलब्ध असतील, असे अॅम्युनिशन फॅक्टरीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मनोज कुमार मोहपात्रा यांनी सांगितले.

क्वार्टर्समध्ये अथवा जवळपास राहणारे कर्मचारी कामावर रुजू होतील. लॉकडाउनच्या काळात येथील यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आल्याने कामात कोणतीही अडचण येणार नाही, असे खडकी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचारी व ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य (लेव्हल थ्री) संजय मेनकुदळे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

शेतकरी आंदोलनावर गप्प का आहेस?; मुंबईत रोखली अजय देवगणची कार – man held for blocking ajay devgn’s car over actor’s silence on farmers’ protest

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) शेतकऱ्यांचे आंदोलन ( farmers protest ) सुरूच आहे. या आंदोलनला काही सेलिब्रिटींनी...

Kangana Ranaut: kangana ranaut : शिवसेना नेत्यांकडून जिवाला धोका, कंगनाची सुप्रीम कोर्टात धाव – kangana ranaut in supreme court seeking transfer criminal cases

नवी दिल्लीः मुंबईत दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत ( kangana ranaut ) आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आता सुप्रीम कोर्टात...

nashik onion growers: कुठे घसरला, तर कुठे वधारला – onion price decline in pimpalgaon, lasalgaon and onlion price increased in manmad and nandgaon

टीम मटागेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कांदादराबाबत चढउतार अनुभवास येत आहेत. सोमवारी पिंपळगाव, लासलगावात कांदादरात ३०० रुपयांची घसरण झाली तर, येवला मनमाड, नांदगावात मात्र...

Recent Comments