Home मनोरंजन दिल बेचारा: बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही; सिनेमांच्या यशाची गणितं बदलणार - ott...

दिल बेचारा: बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही; सिनेमांच्या यशाची गणितं बदलणार – ott and box office collection after corona lockdown


मुंबई : बॉलिवूडचे अनेक तारे-तारका आपल्या चित्रपटांतून ओटीटीवर येण्यासाठी सज्ज आहेत. येत्या आठवड्यांमध्ये ओटीटीवर एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदशित होताहेत. पण, बॉक्स ऑफिसप्रमाणे १०० कोटी क्लबची स्पर्धा नसल्यानं, कलेक्शनचे आकडे कळणार नसल्यानं चित्रपटांच्या यशाची गणितं पूर्णपणे बदलणार आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा ‘दिल बेचारा’ बेचारा हा चित्रपट येत्या २४ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होतोय. त्यानंतर पुढे प्रत्येक शुक्रवारी बॉलिवूडचे बडे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षयकुमार (लक्ष्मी बॉम्ब), अजय देवगण (भूज), आलिया भट (सडक २), अभिषेक बच्चन (बिग बुल), कुणाल खेमू (लुटकेस), विद्युत जमवाला (खुदा हाफिज), विद्या बालन (शकुंतला देवी), जान्हवी कपूर (गुंजन सक्सेना) हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय असेल, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. बॉलिवूड चित्रपटांसाठी यशाचं मोजमाप ठरणाऱ्या ‘शंभर कोटी क्लब’च्या ट्रेंडवरदेखील यानिमित्तानं प्रश्नचिन्ह असेल. मिळालेल्या माहितीनुसार अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी तब्बल १३० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं कळतंय. तर अजय देवगणच्या ‘भूज’ सिनेमाची खरेदी १२५ ते १३० करोड रुपयांमध्ये ओटीटीवर झाल्याची चर्चा आहे. सोबतच अजयचीच निर्मिती असलेला आणि अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला ‘बिग बुल’ अंदाजे ८० कोटीला विकला गेल्याचं कळतंय. येत्या काही दिवसांत अजय देवगणची निर्मिती असलेला आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘छलांग’ सिनेमादेखील ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चिन्हं आहेत. यासाठी अंदाजे ७० कोटींची बोली लागल्याचं कळतंय. यापैकी काही चित्रपटांनी पेपर व्ह्यू कलेक्शनची श्रेणीदेखील स्वीकारली आहे, ज्यात ओटीटीवर किती प्रेक्षक त्यांचा सिनेमा पाहतात; या आकडेवारीतून सिनेनिर्मात्याला मोबदला मिळतो.

शंभर कोटी क्लब?

गेल्या दोन आठवड्यांत काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. परंतु, मोठे कलाकार आणि बिग बजेट सिनेमांपैकी एकच ‘गुलाबो सिताबो’ हा प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसचे आकडे आणि कोट्यवधी रुपयांची कमाई हे सर्वसाधारणपणे सिनेमांच्या यशाचं प्रतीक मानलं जात. ‘गुलाबो…’ जर सिनेमागृहांत प्रदर्शित झाला असता तर तो सिनेमा शंभर कोटी क्लबच्या यादीत नक्कीच विराजमान झाला असता अशी बीटाऊनमध्ये चर्चा आहे. परंतु, आता बडे चित्रपट ओटीटीवर येणार म्हटल्यावर शंभर कोटी क्लबचा मानदंड बॉलिवूडला बाजूला सारावा लागणार असल्याची चिन्हं आहेत. येत्या काही दिवसांत ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची नवी श्रेणी बॉलिवूडमध्ये विकसित होईल, असं सांगितलं जातंय.

विक्रीचे अंदाजे आकडे
अक्षय कुमार – लक्ष्मी बॉम्ब – १३० कोटी

अजय देवगण – भूज – १२५ ते १३० कोटी

वरुण धवन – कुली नंबर १ – १२० कोटी

अभिषेक बच्चन – बिग बुल – ८० कोटी

सुशांतसिंह राजपूत – दिल बेचारा – ७० कोटी

जान्हवी कपूर – गुंजन सक्सेना – ७० कोटी
सुशांतवर कोणतेही आरोप केले नव्हते; पोलीस चौकशीत संजनाचा खुलासा
डिजिटली प्रदर्शित होणारा चित्रपट किती प्रेक्षकांनी पाहिला हे केवळ त्या संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जाणकार व्यक्तींना तसंच त्या सिनेनिर्मात्याला समजू शकतं. जेव्हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होतो. तेव्हा त्यांचं कलेक्शन उघड केलं जातं. परंतु, आता तसं होईल का हे सांगता येणार नाही. कारण, ओटीटीवर किती प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला हे जाहीर करण्याचे हक्क केवळ त्या ओटीटी कंपनीकडे असतील. त्यामुळे आतापर्यंत बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवर आधारित, सिनेमा हिट किंवा फ्लॉप झाला हे ठरवलं जायचं; पण आता तसं होणार नाही.

– तरण आदर्श, ट्रेंड अॅनालिस्टSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

खडा मारायचाच झाला तर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्याला पवार काका-पुतण्यांनी अत्यंत हसत-खेळत उडवून लावले आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्राच्या मातीतले राजकारण हे वरून तिथल्या साखरेसारखे...

मुंबईच्या किचनमध्ये नाशिकची भाजी

म. टा. वृत्तसेवा, कमी कालावधीत काढणीस येणाऱ्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो. सिंचनाच्या विविध सुविधा उपलब्ध झाल्यापासून जिल्ह्यात पालेभाज्यांची लागवडही वाढली आहे. बाजारात...

Recent Comments