Home मनोरंजन दिव्या खोसला कुमार ट्रोल: सोनू निगमवर बोलणं दिव्याला पडलं महाग, मीम्स होतायेत...

दिव्या खोसला कुमार ट्रोल: सोनू निगमवर बोलणं दिव्याला पडलं महाग, मीम्स होतायेत व्हायरल – sonu nigam bhushan kumar divya kumar khosla got trolled on social media


मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि कंपूशाहीच्या मुद्द्यावरुन घमासान सुरू असतानाच, गायक सोनू निगम यानंही यावरुन नाराजीचा नवा सूर आळवला. सोनू निगमनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यानं टी- सीरिजचे मालक भूषण कुमार याच्यावर संगीत उद्योग क्षेत्रातील माफिया असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच सोनूने त्याच्यासोबत पंगा न घेण्याचा सल्लाही दिला.

२५ दिवसांच्या शुटिंगचे ‘जेठालाल’ घेतो ३६ लाख, रॉयल आहे खासगी आयुष्य

या सगळ्यात भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमारची प्रतिक्रिया समोर आली होती. दिल्लीतील रामलीलामध्ये पाच रुपयांसाठी सोनू गाणं गायचा. टी- सीरिजने त्याला संधी दिली.. मोठं केलं. पण आता तोच कृतघ्न झाला. दिव्याने सोनूवर अनेक गंभीर आरोप केले. पण आता सोशल मीडियावर दिव्या कुमारला पाठिंबा कमी आणि ट्रोल जास्त करण्यात येत आहे.

एका युझरने लिहिले की, ‘व्हिडिओमध्ये भगवत गीतेचा उल्लेख केल्यावर सगळ्या गोष्टी योग्य होत नाहीत. तसंही तुला सर्वांची क्षमा मागायला हवी. कारण याद पिया की आने लगी मध्ये फाल्गुनी पाठकचा आवाज जास्त मधूर होता.’ अजून एका युझरने लिहिले की, ‘दीदी, तू किती ड्रामा करतेस.’

सुशांतचे वडील म्हणाले, तीन वर्षांच्या प्रार्थनेनंतर जन्मलेला सुशांत

काय म्हणाली होती दिव्या खोसला कुमार-

दिव्यानं तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर सोनूबद्दल अनेक गोष्टी लिहीत त्याला कृतघ्न असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये सोशल मीडियाच्या द्वारे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अभिनय क्षेत्रात नवोदित कलाकारांना चटकन न मिळणारी संधी, बड्या कलाकारांचे स्टारपुत्र, स्टारकन्या यांचे होणारे लाड यावरुन वाद सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

सिनेसंगीत क्षेत्रातही काही वेगळी परिस्थिती नसल्याचं सांगत गायक सोनू निगमनं म्हटलं होतं. भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमार हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत सोनूच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ‘टी-सीरीज’मध्ये ९७ टक्के लोकं ही आउटसाइडर्स म्हणजेच सिनेसृष्टी किंवा संगीतक्षेत्राच्या बाहेरची आहेत. याच कंपनीनं अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळवून दिली आहे. असं म्हणत तुम्ही किती बाहेरून आलेल्या कलाकारांना संधी दिल्यात? असा सवालही तिनं सोनू निगम याला विचारला आहे.

आता सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचं प्रमोशन करणार राजकुमार राव

दिव्यानं या व्हिडिओमध्ये सोनू निगमला त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. गुलशन कुमार यांच्यामुळं सोनू निगमचं करिअर सुरू झालं होतं. सोनू दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्याला संधी दिली होती. त्यामुळं आज तो इथपर्यंत पोहचेला आहे. असं दिव्या म्हणाली. ‘टी-सीरीज’ जेव्हा अडचणीत होती तेव्हा सोनूनं दुसऱ्या कंपनीसाठी काम सुरू केलं.असंही दिव्या म्हणाली.

सोनू निगमचे अबू सालेमसोबत संबंध

सोनू निगनचे अबू सालेमसोबत संबंध होते, असं ही दिव्यानं तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. भूषण कुमार यांनी अबू सालेमपासून वाचण्यासाठी सोनू निगमची मदत मागितल्याचं सोनूनं म्हटलं होतं. यावरून सोनू निगमचे अबू सालेमसोबत संबंध होते, हे सिद्ध होतं, याकडं सर्वांनी लक्ष द्या, असंही दिव्या म्हणते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींनी सांगितलं, त्यांच्या कुठल्या निर्णयाने होतेय करोना रुग्णसंख्येत घट – india has one of the highest recovery rates of 88 percent...

नवी दिल्ली: भारतात सध्या करोना संसर्गाच्या ( coronavirus india ) रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि करोनातून बरे ( covid 19 india ) होण्याचे...

Recent Comments