Home ताज्या बातम्या दिशा सालियाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाद मागा; सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश supreme-court-ask-disha-salian-s-...

दिशा सालियाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाद मागा; सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश supreme-court-ask-disha-salian-s- petitioner-withdrawn-pil-and-approch-to-bombay-high-court-mhaa | News


दिशा सालिया(Disha salian)च्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात जा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. दिशा सालिया ही सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती.

मुंबई, 26 ऑक्टोबर:  अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असतानाच दुसरीकडे त्याच्या आधीच्या मॅनेजरच्या मृत्यूबद्दलही अपडेट्स येत आहेत. दिशा सालिया (Disha Salian)च्या मृत्यूबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात (Bombay High court) जाण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआय (CBI)कडे सोपवण्यात यावा अशी मागणी केली आहे.

पुनीत कौर यांनी दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी दिशा सालिया हिने आत्महत्या केली.  8 जून 2020 रोजी दिशाच्या घरात पार्टी होती. या पार्टीला तिचा बॉयफ्रेंड रोहन रॉय आणि इतर 6 जण उपस्थित होते. पार्टीनंतर  दिशाने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन तिचं जीवन संपवलं. दिशावर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. असा आरोप करण्यात येत आहे. दिशाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता याचिकाकर्ते काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल


Published by:
Amruta Abhyankar


First published:
October 26, 2020, 2:30 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sourav ganguly: India vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले – rishabh pant and wridhiman...

सिडनी, india tour of australia 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासन सुरुवात होणार आहे. पण भारताच्या संभाव्य संघात रिषभ पंत...

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

‘त्या’ प्रसूतीबाबत पोलिसांनी मागविली कागदपत्रे

म. टा. खास प्रतिनिधी, अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. या मुलीवर सामूहिक...

Recent Comments