Home शहरं पुणे दुकानांना अंशत: मुभा

दुकानांना अंशत: मुभा



रेड झोनमधील पुणे, मुंबई, ठाण्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतरत्र किंचित दिलासा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे

राज्यात करोना रुग्णांच्या संख्येनुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी केल्यानंतर आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी सरकारने अनेक अटी शिथिल केल्या आहेत. राज्यातील ऑरेंज व ग्रीन झोनमधील बरीच दुकाने खुली होणार असली, तरी पुण्यासह मुंबई-ठाण्यात सध्या सबुरीचेच धोरण अवलंबिण्यात आले आहे. रेड झोनमध्ये एकल दुकाने, खासगी कार्यालये, बांधकामे यांना परवानगी असली, तरी पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) त्यावर बंदीच असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

रुग्ण संख्येनुसार करण्यात आलेल्या रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये पुणे महानगराचा समावेश रेड झोनमध्येच आहे. करोनाच्या प्रादुर्भावानुसार महापालिकांनी प्रतिबंधित क्षेत्र (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलिस ठाण्याचे क्षेत्र आदी) निश्चित केले आहेत. पुण्यामध्ये …… प्रतिबंधित क्षेत्र असून, हा भाग वगळता इतर झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतर वस्तूंची एकल दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने, असा असेल. दुकान एकल आहे, की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल, असेही सरकारने आदेशात म्हटले आहे. या पाच दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल, स्टेशनरी, मद्यविक्री आदी दुकानांचा समावेश आहे. मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त दुकाने सुरू करता येणार नाहीत. या पाचमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा समावेश नाही. ही दुकाने सुरू करताना सुरक्षित वावर, गर्दी न करणे यासारख्या इतर नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक असणार आहे. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजार यांमधील दुकाने बंदच राहतील.

नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची, तसेच बांधकामे करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. केवळ अर्धवट स्वरूपातील बांधकामे पूर्ण करण्यास महापालिका आयुक्तांच्या परवानगीने मान्यता देण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या बाहेरील पुणे महानगराच्या प्रदेशात बांधकामांना परवानगी असेल; पण बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रीन व ऑरेंज झोनमधील खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुणे व मुंबई महानगर प्रदेशामध्ये खासगी कार्यालये बंदच राहतील.

…………..

चौकट १

हे सुरू होणार….

एकल दुकाने

मद्यविक्री

जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकाने

(कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी)

हे बंदच

खासगी कार्यालये

केशकर्तनालय

ब्यूटी पार्लर

(संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रात)

…………….

मुंबईतून कुठलीही रेल्वे सोडण्याचा विचार नाही

मुंबईमध्ये कंटेन्मेट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात २६ सरकारी प्रयोगशाळांतून दिवसाला साधारणपणे दहा हजार स्वॅबची चाचणी होत आहे. आयसीएमआरच्या निकषानुसार चाचण्या होत असून शासकीयबरोबर काही खासगी प्रयोगशाळांमध्येही करोनाची चाचणी होत आहे. तसेच, राज्यात पुरेशा प्रमाणात रुग्णालयात खाटांची व्यवस्था उपलब्ध आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments