Home संपादकीय दुहेरी लढा

दुहेरी लढा


करोना संकटाच्या विरोधात मानवतेच्या रक्षणासाठी संपूर्ण जग एकवटलेले असताना, दहशतवाद्यांच्या आणि त्यांना फूस देणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशाच्या कारवाया थांबताना दिसत नाहीत; वाढतच आहेत. काश्मीरमध्ये एकीकडे ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे, तर दुसरीकडे दहशतवादी हल्ले करीत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी आणि करोना या दोहोंशी लढा द्यावा लागत आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा क्षेत्रात घुसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना, रविवारी लष्कराच्या दोघा उच्चाधिकाऱ्यांसह दोन जवानांना आणि जम्मू-काश्मीरच्या एका पोलिस अधिकाऱ्याला हौतात्म्य प्राप्त झाले. ही अतिशय क्लेषदायक घटना आहे. हंदवाडा क्षेत्रातील चंगीमुल्ला गावात घुसून दडून बसलेल्या या दहशतवाद्यांच्या विरोधात, लष्कराची ‘राष्ट्रीय रायफल’ची २१वी तुकडी आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी संयुक्त मोहीम उघडली होती. सुमारे बारा तास चाललेल्या या मोहिमेद्वारे, गावातील निरपराध नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. दोन दहशतवाद्यांचा खात्माही केला. त्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक असून, दुसरा लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा असल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेत कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, पोलिस उपनिरीक्षक अहमद पठाण, नाईक राजेश कुमार आणि लान्स नाईक दिनेश सिंह यांना वीरगती प्राप्त झाली. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची ही मोठी हानी आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी उभारलेल्या राष्ट्रीय रायफलसारख्या विशेष सैन्यदलाचा उच्चाधिकारी गमावणे धक्कादायक आहे. काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी अलीकडेच तेथील दौरा करून, परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या महिन्यात ताबारेषेजवळील चकमकीत विशेष दलाचे पाच जवान हुतात्मा झाले. त्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचाही खात्मा झाला. दहशतवाद्यांचे पालनपोषण करून, त्यांना सक्रिय करतानाच, दुसरीकडे काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याची दुहेरी खेळी पाकिस्तान खेळत आहे. त्याचा हा दुटप्पीपणा उघडा करताना, अधिक सतर्क राहून, दहशतवाद्यांच्या विरोधात व्यापक मोहीम उघडण्याशिवाय पर्याय नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tamil Nadu Lockdown Extended Till 31 March – Tamil Nadu : तामिळनाडूत लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ | Maharashtra Times

हायलाइट्स:तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी ६ एप्रिल रोजी मतदानलॉकडाऊन निर्बंध कडक करण्याचा राज्य सरकारचा निर्णयतामिळनाडूमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनचेन्नई :तामिळनाडू विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या...

मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, घराकडे परतत असणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी रविवारी दोन जणांना अटक केली. दोघा आरोपींना सोमवारपर्यंत (एक मार्च) पोलिस...

redmi note 10 smartphone: Redmi Note 10 स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत हे फीचर्स मिळणार – redmi note 10...

हायलाइट्स:Redmi Note 10 स्मार्टफोन ४ मार्चला होणार लाँच३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत हे फीचर्स मिळणार 33 वॉट फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीनवी दिल्लीःRedmi...

Recent Comments