Home ताज्या बातम्या दूरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी, शास्त्रज्ञांनी तयार केलं उपकरण iit ropar...

दूरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी, शास्त्रज्ञांनी तयार केलं उपकरण iit ropar developes infrared vision system to detect coronavirus symptoms mhpl | Coronavirus-latest-news


रोपर आयआयटीच्या (IIT Ropar) इंजिनीअर्सनी इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम (infrared vision system) तयार केलं आहे.

चंदीगड, 26 एप्रिल : एखादी व्यक्ती कोरोना (Corona) संशयित आहे की नाही हे तपासण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरुवातीला त्या व्यक्तीचं तापमान तपासलं जातं, हे तपासण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असते. ज्यामुळे एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर दुसऱ्या व्यक्तीलाही त्याचा धोका असतो. मात्र आता शास्त्रज्ञांनी असं उपकरण तयार केलं आहे, ज्यामुळे दूरूनच चेहरा पाहून एखादी व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी हे समजणार आहे.

रोपर आयआयटीच्या (IIT Ropar) इंजिनीअर्सनी इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम (infrared vision system) तयार केलं आहे, ज्यामुळे संबंधित व्यक्ती स्वत:चा चेहरा स्कॅन करेल आणि दुसऱ्या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटरवर ती व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी हे समजण्यास मदत होईल.

शास्त्रज्ञांनी सांगितलं, इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम 160×120 पिक्सेल रेजोल्युशनसह विविध प्रकारचं तापमान मोजतो. यह उपकरण छोटं, सुरक्षित आणि कोणत्याही व्यक्तीशिवाय तपासणी करण्यास सक्षम आहे.

हे वाचा – प्रत्येक व्यक्तीमध्ये Corona ची विविधं रूपं; का करतोय व्हायरस स्वत:मध्ये बदल?

आयआयटी रोपरमधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील असोसिएट प्रोफेसर रवीबाबू मूलवीशला यांनी सांगितलं, “एखाद्या व्यक्तीमध्ये ताप किंवा सर्दी अशी कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत का? तसंच ती व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी आहे हे ओळखण्यासाठी हे उपकरण मदत करेल.

मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी लोकांची तपासणी करण्यासाठी हे उपकरण खूप फायदेशीर ठरेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

संकलन, संपादन – प्रिया लाड

हे वाचा – तुम्हीही होऊ शकता कोरोना वॉरिअर्स, PM मोदींनीच सांगितली प्रक्रिया

First Published: Apr 26, 2020 01:14 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

gujarat coronavirus: एक अॅम्ब्युलन्स अन् चार मृतदेह… गांधीनगरमध्ये करोनाने होणारे मृत्यू लपवले जाताहेत? – gujarat coronavirus dead bodies in ambulance photo viral nitin patil...

अहमदाबादः गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ( gujarat coronavirus ) सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( viral photo ) होतोय. या व्हायरल फोटोत एका...

Recent Comments