Home शहरं नाशिक दोघांच्या 'ऑनलाइन'ने पालकांचीच शाळा!

दोघांच्या 'ऑनलाइन'ने पालकांचीच शाळा!


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या शाळाच सुरू नसल्याने सकाळी लवकर उठून मुलांनी शाळेत वेळेवर पोहोचावं यासाठी यावर्षी पालकांना कोणतीही धावपळ करावी लागत नसल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही ऑनलाइन शिक्षणाची कसरत सांभाळता सांभाळता पालकांच्या नाकीनऊ येत असून, घरी एकच स्मार्टफोन असलेले दोन मुलांना एकाच वेळी ऑनलाइन शिक्षणाचा लाभ कसा द्यावा, या पेचात सापडले आहेत.

यंदा १५ जूनपासून शहरातील जवळपास बहुतांश शाळांनी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्याची जबाबदारी नसली, तरी आता मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनसमोर बसवून ठेवण्याची जबाबदारी मात्र पालकांवर आली आहे. इंटरनेट कनेक्शनपासून अचानक लाइट जाण्यापर्यंतच्या अनेक समस्यांना या ऑनलाइन शिक्षणादरम्यान पालकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही अजून एक महत्त्वाची समस्या म्हणजे घरी असलेली दोन मुले आणि एकच स्मार्टफोन. यामुळे अनेक पालकांना एक दिवस केवळ एकाच पाल्याला शिक्षणासाठी स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्यामुळे दुसऱ्या पाल्याला त्या दिवशीच्या ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहणे अशक्य होत आहे.

घरात दोन मुले असतील, तर दोघांचेही वर्ग सकाळी साधारण एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे एकाच पाल्याला या शिक्षणाचा लाभ घेता येतो. त्यातही अनेक पालक लॅपटॉपच्या माध्यमातून दुसऱ्या पाल्यासाठी व्यवस्था करतात. परंतु, ज्यांच्याकडे डेस्कटॉप, लॅपटॉप नाहीत अशा पालकांना मात्र अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा घरी दोन स्मार्टफोन असूनही घरातील एका व्यक्तीला नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर पडावेच लागते. अशा पालकांची संख्या शहरात मोठी आहे. त्यामुळे मुलांच्या ऑनलाइन वर्गादरम्यान घरात एकच स्मार्टफोन उपलब्ध असतो. सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अनेक पालकांना तातडीने दुसरा स्मार्टफोन घेणे शक्य नसल्याने ही समस्या सोडविण्यात शाळांनीच पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे पालकांचे मत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments