Home ताज्या बातम्या दोन वाघिणींमध्ये पाण्यात रंगला WWF चा थरार, पाहा लढाईचा दुर्मीळ VIDEO |...

दोन वाघिणींमध्ये पाण्यात रंगला WWF चा थरार, पाहा लढाईचा दुर्मीळ VIDEO | Viral


रिद्धी आणि सिद्धी असं या दोन वाघिणींचं नाव आहे. दोघी वाघिणी एकमेकांवर डरकाळी फोडून वचर्स्व गाजवण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

माधोपुर, 26 नोव्हेंबर : वर्चस्व हा प्राण्यांमधला अगदी कळीचा मुद्दा असतो. आपल्या जागेवर कुणी दुसऱ्यानं हक्क सांगू नये यासाठी जीवाची बाजी लावली जाते. आतापर्यंत वाघांमधली जंगलात किंवा झाडा-झुडपातली किंवा वाघिणीसाठी केलेली लढाई पाहिली असेल पण चक्क पाण्यात WWF चा थरार रंगल्याचं पहिल्यांदाच आणि दुर्मीळ असा व्हिडीओ समोर आला आहे.

राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या लढाईत वर्चस्व कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघांमध्ये आपला प्रदेश तयार करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सध्या त्याच परिसरातील झोन नंबर 4 मधला एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन वाघिणी तलावात एकमेकांमध्ये भिडल्या आहेत. त्यांच्या संघर्षातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-या गावात पाण्यालाच लागली आग, जळू लागलं नळाला येणारं पाणी; पाहा थरारक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ 25 नोव्हेंबरचा असल्याचं सांगितलं जात आहे. रिद्धी आणि सिद्धी असं या दोन वाघिणींचं नाव आहे. दोघी वाघिणी एकमेकांवर डरकाळी फोडून वचर्स्व गाजवण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही वाघिणींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. दोन्ही वाघांमधील परस्पर संघर्षाचा हा व्हिडीओ पार्कमध्ये आलेल्या पर्यटकांनी टिपली असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.


Published by:
Kranti Kanetkar


First published:
November 26, 2020, 8:48 PM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments