Home ताज्या बातम्या धक्कादायक! परळीत क्षुल्लक कारणावरुन उपसली तलवार, एकाचं नाक कापलं | Crime

धक्कादायक! परळीत क्षुल्लक कारणावरुन उपसली तलवार, एकाचं नाक कापलं | Crime


परळीत क्षुल्लक कारणावरून तलवारीनं एकाच नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बीड, 26 एप्रिल: कोरोना व्हायरसविरुद्ध आख्ख जग लढत असताना परळीत क्षुल्लक कारणावरून तलवारीनं एकाच नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

परळी शहरातील मिलिंद नगरात शनिवारी रात्री ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फारुक खान पठाण असं जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संभाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा..सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, ठाण्यात शिवसेनेच्या खासदाराचा ‘प्रताप’ तुम्हीही पाहा…

याबाबत मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात तलवार उपसण्यात आली. एवढंच नाही तर चक्क एकाचे नाक कापल्याचा प्रकार घडला आहे. आझाद नगर येथील रहिवाशी असलेल्या शेख शादुल, शेख गौस, शेख रशीद, शेख माहेबूब, शेख दाऊद व इतर दोघांनी मिळून तलवारीने रात्री मारहाण केली. तलवारीने फारुखचं नाक कापण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

हेही वाचा…राज्यातील फुकट रेशन वाटपाबाबत भाजप आमदाराने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, घरच्या समोरील कठड्यावर बसू न दिल्याचा राग मनात धरून फारुखवर तलवारीने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोन आरोपीस अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध सुरु घेत असल्याची तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी दिली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First Published: Apr 26, 2020 05:22 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

micromax in note 1: Micromax IN Note 1 चा पहिला फ्लॅश सेल आज, जाणून घ्या किंमत-ऑफर्स – micromax in note 1 to go on...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सकडून नुकतेच दोन डिव्हाइस Micromax In Note 1 आणि Micromax In 1B लॉन्च करण्यात आले आहे. जवळपास दोन...

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Deepesh Sawant’s Allegations Are False, NCB Tells To Bombay High Court – सुशांतसिंह आत्महत्या: दीपेश सावंतचे ‘ते’ आरोप खोटे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मदतनीस दीपेश सावंत याने एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलावले...

Recent Comments