Hand of God म्हणून प्रसिद्ध असणारा महान फूटबॉलपटू मॅराडोनाच्या (Maradona) निधनाच्या बातमीने क्रीडाविश्वास खळबळ उडाली आहे
ब्युनोस एयर्स: अर्जेंटिनाचे महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या झटक्यामुळे मॅरडोना यांचा त्यांच्या घरी टिगरमध्ये मृत्यू झाला आहे. 30 ऑक्टोबरला मॅरडोना यांच्या डोक्यात झालेल्या रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या होत्या. मॅरडोना यांची टीम गिमनासिया यांनी पॅटरानटोचा 3-0 ने पराभव केल्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात करण्यात आलेल्या स्कॅनिंगनंतर मॅरडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण शस्त्रक्रियेनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचं निधन झालं.
Maradona’s 1986 World Cup campaign is the greatest World Cup performance of all time and will never be topped singlehandedly carried Argentina to a World Cup. RIP King, top 5 player ever. pic.twitter.com/SmSstvJ5RV
One of the greatest icons of the game Diego Maradona passes away, a very sad day for World sports. Condolences to his family, friends and well-wishers. pic.twitter.com/JGFtQJ0vDu
अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एयर्सजवळ असलेल्या ला प्लेटा इथल्या रुग्णालयात मॅरडोना यांना नेण्यात आलं.अर्जेंटिनातल्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मॅरडोना यांची प्रकृती सुधारत होती, पण अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची...
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधित जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. १९० ग्रामपंचायतींत सरपंच...