Home ताज्या बातम्या धनंजय मुंडे-नवाब मलिक अडचणीत, राष्ट्रवादीच्या तीन मोठ्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू | News

धनंजय मुंडे-नवाब मलिक अडचणीत, राष्ट्रवादीच्या तीन मोठ्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू | News


राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तसंच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नवाब मलिक (Nawab Malik) त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत.

मुंबई, 14 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तसंच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नवाब मलिक (Nawab Malik) त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दोघांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घेतली. पण या पत्रकार परिषदेनंतर लगेचच जयंत पाटील, अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतच आहेत.

मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याची गरज नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

काय आहे वाद?

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबध असून यातून आपल्याला दोन मुलं झाली आहेत, याची कबुली दिली, तसंच त्यांच्यावर बलात्काराचा आरोपही करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर माहिती लपवल्याचाही आरोप आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.

राष्ट्रवादीची भूमिका काय?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तसंच नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी निपक्ष चौकशी करावी. जावयाने काय केलं, त्याचं खापर सासऱ्यावर का फोडता?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


Published by:
Shreyas


First published:
January 14, 2021, 1:05 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

anil deshmukh latest news: Anil Deshmukh: राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरे; गृहमंत्री देशमुख यांनी दिली महत्त्वाची माहिती – one lakh houses for police; anil...

नागपूर : राज्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत. त्यामुळे पोलीस दलाची घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलीस दलासाठी एक लाख...

Tim Paine: IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर आली ही वाईट वेळ, जगासमोर लाज गेली… – ind vs aus : australia captain...

नवी दिल्ली, IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची...

Recent Comments